Tunnel Rescue : 41 मजुरांचे जीव वाचवणारा ‘रिअल हिरो’, कोण आहेत रॅट मायनर मुन्ना कुरेशी?
मुन्ना कुरेशीने रेस्क्यु ऑपरेशन दरम्यान बोगद्यातील शेवटची भिंत पाडली होती. त्याने शेवटचा 12 मीटर बोगदा खोदून काढत कामगारांची सुटका केली होती. त्यामुळे सुटकेची वाट बघणाऱ्या कामगारांची भेट घेणारा मुन्ना कुरेशी हा पहिला व्यक्ती होता.
ADVERTISEMENT
Rat Hole Miner Munna Qureshi, Uttarakhand Tunnel Rescue : उत्तरकाशीच्या (Uttarakhand tunnel) बोगद्यातून तब्बल 17 दिवसांनी 41 मजूरांची सुटका झाली आहे. या मजूरांची सुटका करण्यात रॅट मायनर्सने (Rat Hole Miner) मोलाची भूमिका बजावली. या रॅट मायनर्सपैकी एक असलेल्या मु्न्ना कुरेशीची (Munna Qureshi) खूप चर्चा रंगली आहे. कारण मुन्ना कुरेशी हा एकमेव रॅट मायनर होता, ज्याने बोगद्याची शेवटची भिंत पाडली होती आणि सर्वप्रथम अडकलेल्या मजुरांची भेट घेतली होती. त्यावेळेचा तो प्रसंग कसा होता? आणि मजुरांची सुटका केल्यानंतर त्याची काय भावना होती? हे जाणून घेऊयात. (uttarakhand tunnel who is munna qureshi rat hole miner uttarakhand tunnel rescue operation)
ADVERTISEMENT
उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या मजूरांची सुटका करण्यासाठी सुरूवातीला अमेरिकेच्या ऑगर मशिनचा वापर करण्यात आला होता. मात्र रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात असताना अमेरीकेची ऑगर मशिन अचानक खराब झाली होती. त्यामुळे पुढचे रेस्क्यु ऑपरेशन कसे पुर्ण करावे असा मोठा प्रश्न होता. या दरम्यान रॅट मायनर टीमची मदत घेण्यात आली होती. या टीमचा मुन्ना कुरेशी हा एक भाग होता.
हे ही वाचा : Team India Head Coach Update: राहुल द्रविडबाबत मोठी बातमी, मुख्य प्रशिक्षक राहणार की नाही?
मुन्ना कुरेशीने रेस्क्यु ऑपरेशन दरम्यान बोगद्यातील शेवटची भिंत पाडली होती. त्याने शेवटचा 12 मीटर बोगदा खोदून काढत कामगारांची सुटका केली होती. त्यामुळे सुटकेची वाट बघणाऱ्या कामगारांची भेट घेणारा मुन्ना कुरेशी हा पहिला व्यक्ती होता.
हे वाचलं का?
मुन्ना कुरेशी सोबत, मोनु कुमार, वकील खान, फिरोज, परसादी लोधी, विपिन राजपूर आणि राकेश राजपूत यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली होती. 29 वर्षीय मु्ना कुरेशी हा रॅट होल मायनर आहे. तो दिल्लीच्या ट्रेंचलेस इंजिनियरींग सर्विसेस कंपनीसोबत काम करतो आहे. ही ती कंपनी आहे जी गटार आणि पाण्याच्या लाईन स्वच्छ करण्याचे काम करते.
मुन्ना कुरेशीची पहिली प्रतिक्रिया
41 कामगारांची सुटका झाल्यानंतर मुन्ना कुरेशी म्हणाला, आम्ही हळुहळू खोदकाम करत मजूरांच्या आणखीण जवळ पोहोचत होतो. जेव्हा मी शेवटची भिंत पाडली तेव्हा 41 कामगारांनी मला पाहिले आणि मी ही त्यांना पाहिले. ते तब्बल 17 दिवसांनी बाहेरील व्यक्तीला पाहत होते. जशी मी ती शेवटची भिंत पाडून आत शिरलो, तसे त्यांनी माझी गळाभेट घेतली, जोरजोरात टाळ्या वाजवल्या आणि मला खुप खुप धन्यवाद म्हटल्याचे मुन्ना कुरेशीने सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Datta Dalvi : दळवींना अटक, राऊतांचा सुटला संयम; शिंदेंना म्हणाले, चाबकाने…
रॅट होल मायनिंग म्हणजे काय?
रॅट होल मायनिंग हे एक असे तंत्र आहे, ज्यामध्ये उंदरांसारखे छोटे खड्डे खोदून हाताने खोदकाम केले जाते. खोदकाम करण्याची ही एक पारंपारीक पद्धत आहे, ज्यामध्ये बांबूची शिडी आणि दोरीचा वापर केला जातो. या पद्धतीचा वापर करून कोळसा खाणींमध्ये खाणकाम करण्यात आले आहे. ईशान्येकडील मेघालय राज्यात आजही ही खाणकामाची एक सामान्य पद्धत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT