'तिने अंगठी खाल्ली...' केकमध्ये लपवलेली सोन्याची अंगठी, प्रेयसीने ती खाल्ली अन्...

मुंबई तक

viral news youth hid the gold ring in the cake his girlfriend ate it then he got proposed to her like this

ADVERTISEMENT

प्रेयसीसाठी केकमध्ये लपवलेली सोन्याची अंगठी (फोटो: AI)
प्रेयसीसाठी केकमध्ये लपवलेली सोन्याची अंगठी (फोटो: AI)
social share
google news

Viral News: प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. जेव्हा-जेव्हा एखादी व्यक्ती या अभिव्यक्तीसाठी तयार होते तेव्हा तो खूप तयारी करतो. हा क्षण खूप खास बनवण्याचा आणि समोरच्या व्यक्तीला आश्चर्यचकित करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण अशीच एक घटना व्हायरल होत आहे, जिथे प्रपोज करणं एका तरुणाला प्रचंड महागात पडलं आहे. त्यावेळी जे काही घडलं ते आता बरंच व्हायरल होत आहे.

कप केकच्या आत ठेवलेली अंगठी अन्...

चीनमधूनही अशी एक बातमी समोर आली आहे की, एका तरुणाला त्याच्या मैत्रिणीला प्रपोज करून आश्चर्यचकित करायचे होते. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, तो पुरूष लिऊ नावाच्या महिलेवर प्रेम करत होता, पण तो ते सांगू शकत नव्हता. कसे तरी त्याने धाडस केले आणि एका रेस्टॉरंटच्या मदतीने मैत्रिणीला एक आश्चर्यचकित करणारी योजना त्याने आखली. त्याने तिच्यासाठी एक खास अंगठी घेतली आणि ती कप केकमध्ये लपवली. पण हा कप केक मैत्रिणीसमोर येताच तिने तो एकाच झटक्यात पूर्ण खाऊन टाकला.

हे ही वाचा>> Valentine's Week List 2025: कधीपासून सुरू होतोय व्हॅलेंटाईन आठवडा.. कोणत्या दिवशी काय साजरं करायचं?

केकच्या खराब दर्जामुळे अंगठी केकमध्ये घुसली असे लिऊला वाटले. पण जेव्हा लिऊने पाहिले की ती प्रपोजल रिंग आहे, तेव्हा तिला बेकरीकडे तक्रार करावी असे वाटले.

अन् लिऊने प्रस्ताव स्वीकारला!

लिऊ म्हणते की, केकवर क्रीमचा जाड थर होता. ते खात असताना, तिला  काहीतरी कठीण गोष्ट दाताला लागली त्यामुळे तिने ती लगेच थुंकून टाकली. सुरुवातीला लिऊला वाटले की, हा केक खराब आहे, परंतु नंतर असे उघड झाले की ही तीच अंगठी होती जी तिच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणाने केकमध्ये लपवली होती.

हे ही वाचा>> Vastu Tips: चुकूनही बेडरूममध्ये 'या' गोष्टी ठेवू नका, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होईल..

केकसोबत काहीतरी घट्ट असल्याचे लक्षात येताच लिऊने लगेच ते थुंकून टाकले. तिच्या समोर अंगठी होती, जी लिऊ गिळण्याच्या बेतात होती. त्याच क्षणी तिच्या मित्राने केकमधील अंगठी उचलली आणि तो म्हणाला, 'ही तीच अंगठी आहे जी मी तुला प्रपोज करण्यासाठी लपवली होती.'

प्रपोजल रिंग कधीही खाण्याच्या पदार्थात लपवू नका...

ही घटना चीनच्या सिचुआन प्रांतातील गुआंगन येथील आहे, जी 'लिउ' नावाच्या यूजरने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये लिहिले होते, 'सर्व पुरुषांनो, अन्नपदार्थांमध्ये प्रपोजल रिंग कधीही लपवू नका.'

हे वाचलं का?

    follow whatsapp