Vishalgad Encroachment : विशाळगडावर दगडफेक! महिला, नागरिकांना मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

विशाळगड परिसरात दगडफेक आणि नागरिकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
विशाळगड परिसरात दगडफेक झाल्याची घटना.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा तापला

point

विशाळगड परिसरात दगडफेक, स्थानिकांना मारहाण

point

विशाळगड परिसरात जमावबंदीचे आदेश

Vishalgad latest news live : (दिपक सूर्यवंशी, कोल्हापूर) विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तापला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी (14 जुलै) संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले. ते किल्ल्यावर पोहोचण्याआधीच तिथे दगडफेक झाल्याची घटना घडली. अतिक्रमण हटवण्याची मागणी करत जमावाने महिला आणि नागरिकांना मारहाण केली. तसेच घरांवर दगडफेक केली. (An incident of stone pelting has taken place in vishalgad in kolhapur)

ADVERTISEMENT

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. काही संघटनांकडून किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे. विशाळगडावरील हिंदू-मुस्लीम समाजाबरोबरच शासकीय अतिक्रमणेही आहेत. ती दिवसेंदिवस वाढत असून, आजघडीला १५० पेक्षा जास्त अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारकडे केली आहे. 

भवानी मातेचे दर्शन घेऊन विशाळगडाकडे रवाना

संभाजीराजे छत्रपती यांनी 'चलो विशाळगड'ची हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत अनेक शिवप्रेमी संघटना सहभागी झाल्या. कोल्हापुरातील भवानी मातेचे दर्शन घेऊन संभाजीराजे छत्रपती शिवप्रेमींसह रवाना झाले. या पार्श्वभूमीवर विशाळगडावरील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. विशाळगड परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

"विशाळगडवरील अतिक्रमण मुक्तिप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल अहित. पण, गेल्या दीड-दोन वर्षात एकाही याचिकेवर सुनावणी झालेली नाही. राज्य शासनाचे महाधिवक्ता विशाळगड अतिक्रमण प्रश्नी झोपले आहेत का?", असा सवाल संभाजीराजेंनी रवाना होण्यापूर्वी सरकारला केला. 

विशाळगडावर दगडफेक, धारदार शस्त्राने हल्ला

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर पोहचण्यापूर्वी दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काही लोकांच्या जमावाने विशाळगड अतिक्रमण परिसरातील महिला आणि नागरिकांना मारहाण केली. 

ADVERTISEMENT

स्थानिक नागरिकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. त्याचबरोबर महिला आणि पुरुषांना मारहाण करण्यात आली. यात काही जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT