अखंड भारताचा नकाशा, मोर, कमळ अन्… नवीन संसद भवनात काय आहे खास?

मुंबई तक

ADVERTISEMENT

The countrys new Parliament has been carved with a map of Akhand Bharat, statues of Ambedkar-Sardar Patel, Chanakya, etc.
The countrys new Parliament has been carved with a map of Akhand Bharat, statues of Ambedkar-Sardar Patel, Chanakya, etc.
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवीन संसद भवन पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय. या वास्तूमध्ये वारसा, वास्तुकला, कला आणि कौशल्यही आहे. त्यात संस्कृती आहे तसंच संविधानाचा स्वरही आहे. देशातील विविध भागांतील विविधतेचा या नव्या इमारतीत समावेश करण्यात आला आहे, असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

देशाच्या नव्या संसदेत अखंड भारताचा नकाशा, आंबेडकर-सरदार पटेल, चाणक्य यांच्या पुतळ्यासह अशा अनेक गोष्टी कोरण्यात आल्या आहेत, ज्या पाहून देशवासीयांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, लोकसभेचा आतील भाग हा राष्ट्रीय पक्षी मोरावर आधारित आहे, तर राज्यसभेचा भाग हा राष्ट्रीय फूल कमळावर आधारित आहे आणि राष्ट्रीय वृक्ष वड हा देखील संसदेच्या प्रांगणात आहे.

नवीन संसद भवनात काय आहे?

भाजपचे संघटन मंत्री बीएल संतोष यांनी ट्विट केलं आहे. यात संसदेतील आतील भाग कसा आहे, त्याचे फोटो आहे. ही केवळ इमारत नाही. हे भारताच्या अभिमानास्पद सभ्यतेला पुढे नेणार आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. बीएल संतोष यांनी काही फोटो आपल्या ट्विटमध्ये शेअर केले आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ‘तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर सेक्स…’, बहिणीच्या नवऱ्यानेच 8 महिने केला रेप

Key features of the india's new Parliament
नव्या संसदेच्या इमारतीत ठेवण्यात आलेल्या काही वस्तू महाराष्ट्रातून पाठवलेल्या आहेत.

 

नवीन संसदेत, सेंट्रल हॉल इमारतीच्या मध्यभागी बांधलेला आहे. त्याच्यावर एक अशोक स्तंभ आहे. या सभागृहात संविधानाची प्रत ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासोबतच महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्यासह देशातील पंतप्रधानांचे मोठे फोटोही लावण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

नवीन संसद भवनात किती लोक बसू शकतात?

नव्या संसद भवनाची रचना त्रिकोणी आकारात करण्यात आली आहे. सध्या लोकसभेत 590 आणि राज्यसभेत 280 लोकांची बसण्याची क्षमता आहे. नवीन संसद भवनात लोकसभेच्या 888 जागा आहेत आणि अभ्यागत गॅलरीत 336 पेक्षा जास्त लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. नवीन राज्यसभेत 384 जागा आहेत आणि अभ्यागत गॅलरीमध्ये 336 पेक्षा जास्त लोकांची आसनक्षमता आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनादरम्यान लोकसभेतच 1272 हून अधिक खासदार एकत्र बसू शकतात.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> kandivali murder : आला अन् तरुणाला घातली गोळी, कांदिवलीत भरदिवसा थरार

india's new Parliament building
नवीन संसद भवनाची रचना त्रिकोणी आकारात करण्यात आली आहे.

वाळूचा खडक राजस्थानमधून आयात करण्यात आला आहे

नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी राजस्थानमधील सर्मथुरा येथून वाळूचा खडक, महाराष्ट्रातील नागपूर येथून सागवान लाकूड आयात करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून कार्पेट्स आणण्यात आले आहेत. बांबूचे लाकूड फ्लोअरिंग त्रिपुराची राजधानी आगरतळा येथून आले आहे. दगडी जाळीची कामे राजस्थानमधील राजनगर आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे करण्यात आली आहेत.

Key features of the new Parliament building
आंबेडकर-सरदार पटेल, चाणक्य यांच्या पुतळ्यासह अशा अनेक गोष्टी कोरण्यात आल्या आहेत

औरंगाबाद-जयपूर ते अशोक प्रतीक

अशोक चिन्ह महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून आणण्यात आले आहे. अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून घेण्यात आले आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथून लाल लाखाची खरेदी करण्यात आली आहे. या राज्यातील अंबाजी येथून पांढरे संगमरवरी दगड खरेदी करण्यात आले आहेत. भगवा हिरवा दगड उदयपूर येथून आणण्यात आला आहे. चक्री दादरी, हरियाणा येथून एम-वाळू, एनसीआर हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथून फ्लाय अॅश ब्रिक्स खरेदी करण्यात आली. पितळेचे काम आणि प्री-कास्ट खंदक अहमदाबाद, गुजरात येथून आणले गेले. LS/RS फॉल्स सीलिंग स्टील स्ट्रक्चर दमण आणि दीवमधून आणलं गेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT