Personal Finance: NPS ला विरोध का होतो? कशी आणि किती मिळते पेन्शन?

मुंबई तक

NPS लागू होत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या नवीन पेन्शन योजनेला विरोध केला. त्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावरुन बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Personal Finance
Personal Finance
social share
google news

बातम्या हायलाइट

point

NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम) म्हणजे नेमकं काय?

point

NPS ला सरकारी कर्मचाऱ्यांचा विरोध

point

NPS या नवीन पेन्शन योजनेचं स्वरूप काय?

National Pension System: मुंबई: सध्या, सरकारी कर्मचारी नॅशनल पेन्शन योजनेला (National Pension System) विरोध करत असल्याचं दिसून येत आहे. कर्मचाऱ्यानी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याची मागणी केली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात 1 एप्रिल 2004 पासून जुनी पेन्शन व्यवस्था बंद करण्यात आली होती. 1 जानेवारी 2004 पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS लागू करण्यात आले. यामध्ये 1 एप्रिल 2004 पूर्वी सरकारी नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन देण्यात येईल, असे म्हटले आहे.

NPS लागू होत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या नवीन पेन्शन योजनेला विरोध केला. त्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावरुन बरेच प्रश्न निर्माण होत आहेत, NPS ला सरकारी कर्मचारी विरोध का दर्शवत आहेत?  NPS ची सुविधा कोणाकोणाला मिळू शकते? याद्वारे पेन्शनची रकमेचं मूल्यांकन कसं केलं जातं? NPS आयकरात काही सूट आहे का?

NPS म्हणजे नेमकं काय?

NPS ही भारत सरकारने सुरू केलेली मार्केट-लिंक्ड पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर, वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शन मिळते. यामध्ये, सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळू शकते. तसेच, फक्त सरकारी कर्मचारीच OPS म्हणजेच जुन्या पेन्शनच्या सुविधेसाठी पात्र होते. NPS सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय म्हणून सुरू करण्यात आली होती. 1 मे 2009 पासून ते खाजगी कर्मचाऱ्यांना आणि सामान्य जनतेला देखील देण्यात आले.

हे ही वाचा: वयाच्या 61 व्या वर्षी भाजपचा 'हा' नेता करणार लग्न; कोणासोबत बांधणार लग्नगाठ, थक्क करणारी Love Story

NPS मधील गुंतवणूक

  • सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 10 टक्के रक्कम एनपीएसमध्ये गुंतवतात. 
  • ही गुंतवणूक किमान 500 रुपयांची असू शकते. 
  • खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी गुंतवणूक ऐच्छिक म्हणजेच इच्छेप्रमाणेआहे.  
  • गुंतवणुकीवर मर्यादा नाही, परंतु इन्कम टॅक्समध्ये सूट मिळण्याची मर्यादा आहे.
  • मूळ पगाराच्या 10 टक्के किंवा जास्तीत जास्त वार्षिक 1.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास कमी असल्यास आयकरावर सूट उपलब्ध आहे. 
  • आयकर कायद्याच्या कलम 80CCD(1B) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. 
  • म्हणजेच, इनकम टॅक्सची बचत करण्यासाठी तुम्ही एनपीएसमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवू शकता.
  • 60 वर्षांच्या वयानंतर, कर्मचारी गुंतवलेल्या रकमेच्या 60 टक्के रक्कम एकरकमी काढू शकतात.
  • तुम्हाला 40 टक्के रकमेतून अॅन्युइटी खरेदी करावी लागेल. यातून मिळणारे उत्पन्न पेन्शनच्या स्वरूपात उपलब्ध असेल.
  • पेन्शनची रक्कम अॅन्युइटी योजनेच्या निवडीवर अवलंबून असेल.  
  • त्याचे दोन स्तर आहेत. टियर-1 आहे आणि टियर-2.
  • टियर-1 मध्ये लॉकिंग कालावधी गुंतवणूकदाराच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत असतो.
  • टियर-वनमध्ये, 60 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल.
  • उर्वरित 40 टक्के रकमेचे थोडे पैसे काढणे काही निवडक परिस्थितींमध्ये शक्य आहे. 
  • लॉक-इन कालावधी नसतो. तुम्ही कधीही पैसे काढू शकता. मात्र, कोणताही कर फायदा मिळणार नाही.

समजा, अंकितचे वय 30 वर्षे आहे. त्याला सरकारी नोकरी मिळाली आहे आणि  त्याचा मासिक पगार सध्या 55000 रुपये आहे.  आता वयाच्या 60 व्या वर्षी त्याला किती पेन्शन मिळेल? तर, 

1. अंकितचा सध्याचा पगार: 55000 रुपये
2. वार्षिक पगार वाढ: 10 टक्के.
3. निवृत्तीचे म्हणजेच रिटायरमेंटचे वय: 60 वर्षे.
4. NPS योगदान: मूळ पगाराच्या 10 टक्के (कर्मचारी) + 10 टक्के (सरकार).
5. निवृत्तीनंतर: 60 टक्के रक्कम एकरकमी काढता येते आणि 40 टक्के रक्कम अॅन्युइटी म्हणजेच वार्षिकी म्हणून घ्यावी लागते.
6. अॅन्युइटी रिटर्न: 6  टक्के वार्षिक (अंदाजे) 
7. सरकारी सेवेतील वर्षे: 30 वर्षे
8. रिटायरमेंटपर्यंत एकूण निधी: 2.22 कोटी
9. 60 टक्के एकरकमी पैसे: 1.33 कोटी (करमुक्त)
10. 40 टक्के वार्षिक गुंतवणूक: 88.92 लाख
मासिक पेन्शन: 44,460 रुपये (करपात्र)

टीप: जर दुसरा अॅन्युइटी पर्याय निवडला तर पेन्शनची रक्कम वेगळी असू शकते. ही अंदाजे गणना आहे.

हे ही वाचा: कामाची बातमी: तुमच्याकडे देखील नाही जन्माचा दाखला? या '5' टिप्स वापरा अन् मिळवा Birth Certificate

NPS बाबत विशेष गोष्टी

  • ही एक सरकार नियंत्रित योजना आहे. हे PFRDA (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) द्वारे नियंत्रित केले जाते. 
  • गुंतवणूक इक्विटी आणि डेट फंडमध्ये केली जाते, जी दीर्घकाळात चांगला परतावा म्हणजेच रिटर्न देते.
  • इतर पेन्शन योजनांच्या तुलनेत कमी खर्च. 
  • कर फायदे (टॅक्स बेनिफिट) देखील उपलब्ध आहेत.

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!

2. पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!

3. Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

 

हे वाचलं का?

    follow whatsapp