Mihir Shah : पोलिसांना गुंगारा देणारा मिहीर शाह कुठे लपला होता?

मुंबई तक

ADVERTISEMENT

आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून अटक केली.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक

point

मिहीर शाह ठाणे जिल्ह्यात लपून बसला होता

point

मिहीर शाहच्या आईसह दोन्ही बहिणींनाही अटक

Mihir Shah Arrested : वरळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शाह याच्या मुसक्या आवळण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले. ७ जुलैच्या पहाटेपासून फरार असलेला मिहीर शाहला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली. मिहीर शाह, आई, बहीण आणि मित्रांसह कुठे लपला होता, याची माहिती समोर आली आहे. (where was hide Worli hit and run accused Mihir shah)

वरळीतील अटरिया मॉलजवळ  ७ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता हिट अँड रनची घटना घडली होती. कावेरी नाखवा या महिलेचा यात मृत्यू झाला. महिलेला वांद्रे वरळी सी लिंकपर्यंत फरफटत नेल्यानंतर मिहीर शाह हा फरार झाला होता. 

Mihir Shah : तीन दिवसांपासून फरार होता मिहीर शाह

७ जुलैपासून मिहीर शाह हा फरार होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. मिहीर शाहला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोध पथके तयार केली होती. या प्रकरणात मिहीरची गर्लफ्रेंडची चौकशी करण्यात आली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण? 

वांद्रे येथे मित्रांकडे जात असल्याचे सांगून मिहीर शाह गर्लफ्रेंडच्या घरून निघाला होता. पोलिसांकडून त्याचा ठिकाणा शोधण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू होते. मंगळवारी (९ जुलै) मिहीर शाहच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले. 

कुठे लपला होता मिहीर शाह?

मिळालेल्या माहितीनुसार मिहीर शाह हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात लपून बसला होता. डोलखांब बंजारा हिल परिसरात गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला अटक केली. एका रिसॉर्टमध्ये मिहीर शाह, त्याची आई आणि बहीण, तसेच त्याचा एक मित्र लपून बसले होते.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

पोलिसांनी कुणाला केली अटक?

टीव्ही 9 वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रिसॉर्ट मालकालाही अटक केली आहे. पोलिसांनी मिहीर शाह, त्याची आई मिनी राजेश शाह (वय ५०), मिहीरची बहीण पूजा राजेश शाह (वय ३२), दुसरी बहीण किंजल राजेश शाह (वय २७), अवादित सिंग तेजसिंग (वय २३), हसन अब्दुल वहीत खान (वय १९)  अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा >> 'गरीब रोज असेच रस्त्यावर मरतील', कावेरी नाखवांच्या पतीचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश 

मिहीरची आई आणि बहिणी झाल्या होत्या गायब

वरळीतील अपघातानंतर मिहीर शाह याची आई, दोन्ही घराला कुलूप लावून पळून गेल्या होत्या. पोलिसांनी मिहीरचे वडील आणि शिवसेना नेते राजेश शाह यांना आधी ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर अटक केली होती. त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT