Kadambari Jethwani: कोण आहे कादंबरी जेठवानी? जिच्यामुळे 3 IPS आले गोत्यात... झालं थेट निलंबन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कादंबरी जेठवाणी प्रकरणात 3 आयपीएस अधिकाऱ्यांचं निलंबन

point

कादंबरी यांना एफआयआरशिवायच करण्यात आली होती अटक

point

कादंबरी जेठवाणीने बॉलिवूड चित्रपटातून केले पदार्पण 

who is kadambari jethwani : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेठवानीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यामुळे ती वादात सापडली होती. आता काही महिन्यांनंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून या प्रकरणाशी संबंधित 3 आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (who is kadambari jethwani that led to the suspension of three ips officers when did you come to mumbai)

ADVERTISEMENT

15 सप्टेंबर 2024 रोजी आंध्र प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय जाहीर करत तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले. या अधिकाऱ्यांवर तपास प्रक्रियेचे पालन न करता आणि एफआयआर नोंदवण्यापूर्वीच कादंबरीला अटक केल्याचा आरोप आहे. या अधिकाऱ्यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोपही अभिनेत्री कादंबरीने केला आहे.

हेही वाचा : Fact Check : अभिषेक बच्चनने VIDEO शेअर करत ऐश्वर्याशी घेतला घटस्फोट? नेमकं सत्य काय?

हे वाचलं का?

काय आहे नेमकं प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आणि चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी दक्षिण अभिनेत्री कादंबरी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. 2 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला असला तरी अभिनेत्रीला 31 जानेवारीलाच अटक करण्यात आली होती. तिला तडकाफडकी अटक करून मुंबईहून विजयवाडा येथे नेण्यात आले. 

"विद्यासागर यांच्यासह उच्चपदस्त पोलीस अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या पालकांचा छळ केला. मला अटक केली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे आणले. पोलिसांनी माझा अपमान केला आणि बेकायदेशीरपणे मला आणि माझ्या वृद्ध पालकांना ताब्यात घेतले आणि कुटुंबाला 40 दिवसांपेक्षा जास्त काळ न्यायालयीन कोठडीत राहण्यास भाग पाडले," असा आरोप कादंबरी जेठवानीने महासंचालकांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता.

ADVERTISEMENT

तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन!

कादंबरीने केलेल्या आरोपात, तिला अटक केल्यानंतर अधिकाऱ्यांनी तक्रार मागे घेण्यास सांगितले आणि जर तिने तक्रार मागे घेतली नाही तर, तिला आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे धमकावले. आता कादंबरीच्या या तक्रारीनंतर माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (डीजी रँक), माजी विजयवाडा पोलीस आयुक्त क्रांती राणा टाटा (महानिरीक्षक दर्जा) आणि माजी पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी (अधीक्षक दर्जा) यांना निलंबित करण्यात आले.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Nagpur Crime: लहान बहिणीसमोर 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, 20 रुपये दिले अन्...

कोण आहेत कादंबरी जेठवानी?

गुजरातमध्ये जन्मलेल्या कादंबरी जेठवानी यांचे वडील मर्चंट नेव्ही अधिकारी आहेत आणि आई रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये व्यवस्थापक आहेत. वर्गात टॉपर असलेल्या कादंबरीने श्रीमती एनएचएल म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. मात्र, तिने डॉक्टर होण्याचा मार्ग सोडून अभिनेत्री बनण्याचा मार्ग निवडला. 'सड्डा अड्डा' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT