Pune Rape Case: अटक होण्यापूर्वी आरोपीने आत्महत्येचा का केला प्रयत्न? पोलिसांनी सांगितली खळबळजनक माहिती

मुंबई तक

Pune Rape Case Latest Update : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रेय गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मागील दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी गाडेला पोलिसांनी अखेर अटक केलीय.

ADVERTISEMENT

Pune Rape Case Latest News Update
Pune Rape Case Latest News Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मध्यरात्री शेतात आरोपी दत्तात्रेय गाडेच्या मुसक्या आवळल्या

point

आरोपी गाडेनं आत्महत्येचा प्रयत्न का केला?

point

पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Pune Rape Case Latest Update : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रेय गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. मागील दोन दिवसांपासून फरार असलेला आरोपी गाडेला पोलिसांनी अखेर अटक केलीय. पुण्याच्या शिरूरमधून पोलिसांनी रात्री दीड वाजता या आरोपीला जेरबंद केलं. दरम्यान, आज शुक्रवारी 28 फेब्रुवारीला आरोपी दत्तात्रेय गाडेला न्यायालयात हजर केले जाणार आहे. परंतु, आरोपी गाडेनं अटक होण्यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर येतेय. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिलीय. 

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

"आरोपीच्या गळ्यावर काही मार्क्स आढळले आहेत. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, यावर बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, गावकऱ्यांची या विषयावर चर्चा झाली नाही. काल आरोपीला ज्यावेळी त्याब्यात घेण्यात आलं, तिथे अत्यंत गर्दी होती. आरोपीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, हा महत्त्वाचा मुद्दा आमच्यासमोर होता.

हे ही वाचा >> 28 February 2025 Horoscope In Marathi : खुशखबर! 'या' राशीच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा, उद्योगधंद्यातही...

म्हणून त्याला तिथून काढण्यात आलं होतं. एका एका गोष्टीवर आता तपास सुरु आहे. त्याच्या शरीरावर काही मार्क असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलं आहे. परंतु, हे कन्फर्म करण्याआधी आम्ही घडलेल्या गोष्टींची खातरजमा करणार आहोत", अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. 

हे ही वाचा >> 'फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडला...', सुरेश धसांना फोन आला, पोलीस जागेवर पोहोचताच घडलं असं काही...

मंगळवारी 25 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास आरोपी दत्तात्रेय गाडेनं स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार केला होता. या घटनेनंतर आरोपी फरारा झाला होता. आरोपी गाडेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 13 पथकं तयार करण्यात आली होती. पोलिसांनी आज मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी गाडेला शिरुर येथील एका शेतातून अटक केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp