Pune porche car accident update : आरोपीच्या रक्ताचे नमुने फेकले कचऱ्याच्या डब्यात, डॉ. तावरे कसा फसला?
Doctor arrested in pune car accident: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर अशी या डॉक्टरांची नावे आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक
पुण्यातील पोर्श कार हिट अॅण्ड रन प्रकरण
पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Ajay Taware Pune Porsche Accident : कल्याणीनगरमध्ये १८ मे रोजी पहाटे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना बेड्या ठोकल्या. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी न पाठवता दुसऱ्याच व्यक्तीचे रक्त पाठवले. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आले. पोलिसांनी या कटाचा पदार्फाश कसा केला याबद्दलची माहिती समोर आली आहे. (How did Dr. Ajay Taware change the blood sample of the minor accused? Pune Police Commissioner Amitesh Kumar told the inside story)
ADVERTISEMENT
ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोरे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांनी रचलेल्या कटाची इनसाईड स्टोरी सांगितली.
ससून रुग्णालयातील डॉक्टरांना अटक
"अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने 19 मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ससून रुग्णालयात घेण्यात आले होते. आरोपीच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते", असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "मंत्र्यांनी कार्यालयात बोलावून दबाव आणला", अधिकाऱ्याने शिंदेंवर टाकला लेटर बॉम्ब
"अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टरने घेतले होते. पण, रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकले आणि दुसऱ्या व्यक्तीचे रक्त घेतले. डॉक्टरने त्या रक्ताच्या बॉटलवर अल्पवयीने आरोपीचे नाव लिहिले आणि सील केले. तेच रक्ताचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. डॉ. श्रीहरी हळनोर यांनी हे केल्याचे समोर आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते", अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
ADVERTISEMENT
हळनोरेंने पोलिसांना काय सांगितले?
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, हळनोरे यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांनी ससूनचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरून हे केल्याची कबूली दिली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "मी सात वेळा...", निकालाआधी मोदींचं पंतप्रधान पदाबद्दल मोठं विधान
"पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला दुसऱ्या शासकीय रुग्णालयात नेऊन पुन्हा रक्ताचे नमुने घेतले होते. हे नमुने डीएनए जुळवण्यासाठी घेतले होते. जे रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातून फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत, ते अल्पवयीन आरोपीचेच आहे, यासाठी घेतले होते. ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. काल जो रिपोर्ट आम्हाला मिळाला", असेही अमितेश कुमार यांनी सांगितले.
अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे कसे आले समोर?
"दुसऱ्या वेळी घेतलेल्या रक्ताच्या नमुने अल्पवयीन आरोपीचे आहेत, कारण ते त्यांच्या वडिलांच्या डीएनएशी जुळले आहेत. पण, ससून रुग्णालयातून चाचणीसाठी पाठवलेले रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीशी जुळले नाही. ते दुसऱ्या व्यक्तीचे नमुने असल्याचे रिपोर्टमधून समोर आले", अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
हेही वाचा >> तुमच्या मतदारासंघात नेमकं किती मतदान? निवडणूक आयोगाकडून आकडेवारी जाहीर!
"हे समोर आल्यानंतर डॉक्टरला पोलिसांनी रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. त्यात रक्ताचे नमुने बदलल्याची कबूली दिल्यानंतर सोमवारी पहाटे अटक करण्यात आले. त्याचबरोबर डॉ. अजय तावरे यांनाही अटक करण्यात आली", असे ते म्हणाले.
"अल्पवयीन आरोपी ऐवजी डॉक्टरांनी ज्याच्या रक्ताचे नमुने पाठवले, त्याचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फूटेजही जप्त केले आहेत", असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले.
विशाल अग्रवालच्या सांगण्यावरून डॉ. अजय तावरेंने बदलले रक्ताचे नमुने?
विशाल अग्रवालच्या सांगण्यावरून डॉ. अजय तावरेंने या गोष्टी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अजय तावरेंने डॉ. श्रीहरी हळनोरे याला सांगितले. त्यानंतर हळनोरेने रक्ताचे नमुने बदलले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे (विशाल अग्रवाल) डॉ. अजय तावरेसोबत प्रत्यक्ष संपर्क केल्याच्या बाबी तांत्रिक पुराव्याच्या आधारे समोर आलेल्या आहेत."
ADVERTISEMENT