Worli Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण?
Worli Hit and Run case : वरळी पोलिसांनी आरोपी राजेश शहा आणि ड्रायव्हर राजऋषी बिदावत या दोघांना कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने आरोपीचे वडील राजेश शहा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आरोपीचे वडील राजेश शहा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
राजऋषी बिदावत याला एक दिवसाची पोलिस कोठडी
मुख्य आरोपी मिहीर शाह हा फरार आहे.
Worli Hit and Run case : वरळी हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा आणि राजऋषी बिदावत यांना अटक केली होती. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह हा फरार आहे. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. पण वरळी अपघात प्रकरणात आरोपी असलेला मिहीर शाह कोण आहे? हे जाणून घेऊयात. (worli hit and run case who is mihir shah son of rajesh shah ekanath shinde shiv sena leader worli police)
कोण आहे मिहिर शाह?
मिहीर शाह हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.
मिहीरचं दहावी पर्यंतच शिक्षण पुर्ण झाले आहे. या पुढचं शिक्षण त्याने केले नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
राजेश शाह यांचा बांधकाम व्यवसाय आहे. याच व्यवसायात मिहिर त्यांना मदत करतो.
हे ही वाचा : NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
राजेश शाह हे लोकसभा निवडणुकीतील हेमंत सवरा यांच्या प्रचारात देखील ते सक्रिय होते.
ADVERTISEMENT
शिवसेना फुटीनंतर ठाकरेंनी पालघर जिल्हाप्रमुख असलेल्या राजेश शाहांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
ADVERTISEMENT
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाकडून ही कारवाई करण्यात आली होती.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या या कारवाईनंतर राजेश शाहांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते पालघर जिल्ह्याचे उपनेते आहेत.
प्रकरण काय?
रविवारी वरळीतील नाखवा दाम्पत्य मासे लिलावासाठी जात असताना मागून येणाऱ्या बीएमडब्लू कारने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातातून प्रदिप नाखवा हे सुखरूप बचावले होते. मात्र कावेरी नाखवा यांना बीएमडब्लू कार चालकाने फरफटत नेले होते. ज्यामुळे कावेरी यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर प्रदीप नाखवा यांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आरोपी तितक्यात फरार झाला होता.
हे ही वाचा : Sharad Pawar : ''फडवीसांना दिल्लीत जायचंय, राज्यात...'', विधानसभा निवडणुकीआधी पवारांचं मोठं विधान
दरम्यान आज वरळी पोलिसांनी आरोपी राजेश शहा आणि ड्रायव्हर राजऋषी बिदावत या दोघांना कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने आरोपीचे वडील राजेश शहा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तर दुसरा आरोपी राजऋषी बिदावत याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पण 15000 हजार रूपयाच्या तात्पुरत्या रक्कमेवर राजेश शाह यांना जामीन देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT