Mumbai : होळीला फुलं आणायला निघालेला तरूण घरी परतलाच नाही... रस्त्यात बसच्या धडकेत मृत्यू, मित्रही गंभीर
मृत तरूण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) सोशल मीडिया शाखेत कार्यरत होता. अपघाताची माहिती मिळताच पक्षाच्या अनेक नेत्यांनी रुग्णालयात पोहोचून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

होळीला फुलं आणण्यासाठी निघालेल्या तरूणााच अपघातात मृत्यू

रात्री अडीच वाजता दादर मार्केटला निघाले होते मित्र

अपघातात इतर दोन मित्रही गंभीर जखमी
Mumbai : मुंबईतील प्रभादेवी परिसरात गुरुवारी पहाटे एका 29 वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले. हे तिघे तरुण दादर मार्केटमध्ये होळीसाठी फुलं खरेदी करण्यासाठी जात असताना राज्य परिवहन बसने त्यांच्या स्कूटीला धडक दिली. या अपघातात एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा >>Lilavati Hospital: मानवी हाडे, केस आणि 8 कलश... चक्क लीलावतीत काळी जादू, काय आहे सगळं प्रकरण?
पहाटे अडीचच्या सुमारास प्रभादेवी पुलावर हा अपघात झाला. प्रणय बोडके असं मृताचे नाव असून, त्याचे मित्र करण शिंदे व दुर्वेश गोरडे हे जखमी झाले आहेत. हे तिघे तरुण काळाचौकी परिसरातून फुलं खरेदीसाठी दादरला जात होते. त्याच वेळी हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस पुण्याच्या दिशेने जात असताना स्कूटरला धडक दिली. या अपघातात प्रणय बोडके याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे साथीदार करण आणि दुर्वेश हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे ही वाचा >>Pune Crime : बेरोजगारीमुळे मेेकॅनिकल इंजिनीअने सुरू केली चोरी, पोलिसांनी तब्बल 56 दुचाकी केल्या जप्त
प्रणय बोडके हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) सोशल मीडिया शाखेत कार्यरत होता. अपघाताची माहिती मिळताच पक्षाच्या अनेक नेत्यांनी रुग्णालयात पोहोचून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. पोलिसांनी बस चालकाला घटनास्थळी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.