PM मोदींचं देशाला New Year चं मोठं गिफ्ट… काय ते तुम्हीच पाहा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sukanya Samriddhi Yojana will get more interest Modi government's decision
Sukanya Samriddhi Yojana will get more interest Modi government's decision
social share
google news

SSY News: केंद्र सरकारने नवी वर्षाच्या मुहूर्तावर नागरिकांना मोठी भेट दिली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवाती आधीच शुक्रवारी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना (SSY), जानेवारी-मार्च 2024 तिमाहीसाठी 3 वर्षांच्या मुदत ठेवीसारख्या (Time Deposit) काही छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले ​​आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) आणि तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याज किरकोळ वाढवले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तर अनेक छोट्या बचत योजना आहेत त्यांचेही व्याजदर कायम ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

व्याज दर वाढवले

केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दर आता 8.2 टक्के केले आहे. तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा दर7.1 टक्के करण्यात आले आहे. यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज 8 टक्के आणि तीन वर्षांच्या योजनेचे व्याज 7.1 टक्के होते. मात्र या योजानांचे व्याज वाढवून गिप्ट देण्यात आले असले सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल करण्यात आला नाही.

हे ही वाचा >> Exclusive Interview: ‘…म्हणून BJP ने नवे मुख्यमंत्री निवडले’, PM मोदींनी सांगितली Inside स्टोरी

पीपीएफचे व्याज कमी

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या (PPF) व्याजामध्ये एप्रिल-जून 2020 मध्ये बदल करण्यात आला होता. तेव्हा तो व्याज दर7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आला होता. गेल्या वेळी केंद्र सरकारने पंचवार्षिक आरडी योजनेमध्येही कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आज जी घोषणा करण्यात आली त्यापूर्वी केंद्र सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर 4 टक्के ते 8.2 टक्के होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असे असणार व्याज

केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याच्या योजनेवर 4 टक्के व्याज, तर एक वर्षाच्या ठेवीचा व्याज दर 6.9 टक्के, 2 वर्षांच्या ठेवीचा व्याज दर 7.0 टक्के, 3 वर्षांच्या ठेवींवर 7.1 टक्के व्याजदर, 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज आहे. 5 वर्षांच्या आरडी योजनेवर 6.7 टक्के व्याज आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) व्याज 7.7 टक्के, किसान विकास पत्र व्याज 7.5 टक्के, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) व्याज 7.1 टक्के, सुकन्या समृद्धी खात्यावर (SSY) व्याज 8.2 टक्के आहे तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSSY) व्याज 8.2 टक्के असणार आहे.

व्याज दर जास्त

छोट्या बचत योजनांसाठी जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीसाठी केवळ सुकन्या समृद्धी योजनेवर व्याज वाढवण्यात आले आहे. तर 3 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींमध्येही वाढ करण्यात आली आहे. तर इतर सर्व छोट्या बचत योजनांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेवरील व्याज हे बँकेच्या एफडीच्या व्याजापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> 1 जानेवारीला ISRO कडून ऐतिहासिक लाँचिंग, उलगडणार ब्रम्हांडाचं रहस्य

    follow whatsapp

    ADVERTISEMENT