कौटुबिक जीवनाचा त्याग,उद्योगपतीच्या दोन मुली होणार साध्वी, कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

two sister become a sadhavi in barmer rajsthan
two sister become a sadhavi in barmer rajsthan
social share
google news

Two sister become a sadhavi : एकीकडे स्पर्धेच्या या धावत्या युगात सर्वचं आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी पळत सुटली असताना, दुसऱीकडे मात्र दोन सख्ख्या बहिणीनी वकील (Advocate) आणि डॉक्टर (Doctor) व्हायचं स्वप्न मागे ठेवत साध्वी होण्याचा निर्णय़ घेतला आहे. जैन धर्मावर अपार श्रद्धा असल्याने त्यांनी हा निर्णय़ घेतला आहे. कल्पना पारख आणि करिश्मा पारख अशी या दोन मुलींची नावे आहेत. या दोन मुलींना आता येत्या 3 मे रोजी गुडामालानी येथील एक भव्य समारंभात त्यांना आशिर्वाद दिला जाणार आहे. दोघी आता या दिवसाची वाट पाहत आहेत.( two sister become a sadhavi in barmer rajsthan wanted to become a doctor and lawyer)

ADVERTISEMENT

राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेरमध्ये जिल्ह्यातील गुडामालानी येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणी सन्य़ासाचा मार्ग स्विकारणार आहेत. कल्पना पारख आणि करिश्मा पारख या दोन मुलींचे वडिल हे शहरातील मोठे उद्योगपती आहेत. घरी सर्व ऐशोआऱाम आहे. आलिशान आयुष्य या तरूणी जगतायत, तरी देखील या तरूणींनी साध्वी होण्याचा मार्ग स्विकारल्याने आश्चर्य व्यक्त होतेय. तसेच या दोन्ही तरूणींमधील एकीला वकील तर दुसरीला डॉक्टर व्हायचे होते, पण त्या आता संन्यासाचा मार्ग स्वीकारणार आहेत.

वडिल सुरेस पारख यांना पाच मुले असून त्यांच्या दोन्ही मुलींची दीक्षा घरीच होणार आहे. येत्या 3 मे रोजी गुडामालानी येथील एक भव्य समारंभात त्यांना आशिर्वाद दिला जाणार आहे. त्यानंतर त्या सन्यासाचा मार्ग स्विकारणार आहेत. या दिवसानंतर त्या सर्व सुखसोयी आणि रंगीबेरंगी कपड्याच्या दुनियेतून शांत पांढरे कपडे परिधान जैन धर्मासाठी स्वत:ला वाहणार आहेत.

हे वाचलं का?

कल्पना आणि करिश्मा या दोन्ही बहिणी दररोज 20 ते 35 किमी चालतात. दोन्ही बहिणी 3 मेची आतुरतेने वाट पाहत आहेत.5 वर्षापुर्वी धर्माप्रती श्रद्धा इतकी होती की आता त्या कौटुंबिक जीवनाचा त्याग करून संयमाचा मार्ग स्विकारत आहे,असे 24 वर्षीय कल्पनाने सांगितले. मला धर्माविषयी इतकी श्रद्धा वाटली की आता ती 3 मेची आतुरतेने वाट पाहत आहे,असे करिश्माने सांगितले आहे.

दरम्यान ही पहिलीच घटना नाही आहे. याआधी देखील अनेकांनी अशाप्रकारे कौटूबिक जीवनाचा त्याग करून सन्यासाचा मार्ग स्विकारला आहे. अनेकांनी विदेशातील करोडोंची नोकरी सोडून सन्यास घेतला आहे. तर काही उच्च पदस्थ अधिकारी होते, त्यांनी ते पद सोडून सन्यास घेतलाय, असा अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT