Shivsena : ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयावर बुलडोझर, सांगलीत दोन गटात जबरदस्त राडा
मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालयजवळ ठाकरे गटाने शिवसेनेच्या नवीन ऑफिसचे बांधकाम सूरू केले होते. मात्र सदर बांधकामाला शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आक्षेप घेत आयुक्तांकडे तक्रार केली होती.
ADVERTISEMENT
Thackeray and Shinde group clashes together : स्वाती चिखलीकर, सांगली: जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत शिंदे आणि ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांनी एकमेकांना अश्लील भाषेत शिविगाळ करून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मिरजेत ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शिवसेनेकडून नवीन ऑफिसचे बांधकाम सूरू करण्यात आलं होतं. या बांधकामाला शिंदे गटाने (Shinde Group) आक्षेप घेत आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महापालिका कारवाई करण्यास गेली असता ही घटना घडली होती. तब्बल तीन तास हा राडा सुरु होता. त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या अतिक्रमण असलेल्या पत्र्याच्या ऑफिसचे पाडकाम करण्यात आले होते. (uddhav thackeray vs eknath shinde sangli news thackeray and shinde group clashes together on party office demolish sangli news)
ADVERTISEMENT
मिरज शहरातील किल्ला भागातील सेतू कार्यालयजवळ ठाकरे गटाने शिवसेनेच्या नवीन ऑफिसचे बांधकाम सूरू केले होते. मात्र सदर बांधकामाला शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आक्षेप घेत आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर महापालिकेचे अधिकारी दिलीप घोरपडे पथकासह अतिक्रमण काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी महापालिका अधिकारी दिलीप घोरपडे आणि ठाकरे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत मेंगुरे यांच्यात जोरदार वादावादी झाली. सदरची जागा शिवसेनेच्या नावावर असून पटवर्धन राजांनी शिवसेनेला दिली आहे. या संबंधित उताऱ्यावर शिवसेनेचे नाव आहे. त्यामुळे आमचं अतिक्रमण नाही अशी भूमिका चंद्रकांत मेंगुरे यांनी मांडली होती.
हे ही वाचा : New Hit And Run Law : काय आहे नवा हिट अँड रन कायदा? ज्याला ट्रक ड्रायव्हर्सचा जोरदार विरोध
दरम्यान या ठाकरेंच्या ऑफिसच्या पाडकामाची माहिती मिळताच एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण राजपूत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी खरी शिवसेना आमचीच असून अतिक्रमण काढावे, अशी आक्रमक भूमिका राजपूत यांनी घेतली होती. यावरून ठाकरे गटाचे शहरप्रमुख मेंगुरे आणि राजपूत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या बाचाबाचीत दोघांनीही एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी दोन्ही गटाच्या शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.
ठाकरे गटाने ऑफिस पाडण्यास विरोध केला होता. या विरोधात पोलीस आणि शिवसैनिकांच्या जोरदार धक्काबुक्की झाली. जमिनीवर झोपलेल्या चंद्रकांत मेंगुरे यांना फरफटत पोलिसांनी पोलीस गाडीत नेलं. तसेच मेंगुरे यांच्या सहित महिला शिवसैनिकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनतर जेसीबीच्या साह्याने शिवसेनेचे अतिक्रमण असलेलं पत्र्याचे ऑफिस जमीनदोस्त करण्यात आले होते. तब्बल तीन तास हा घटनाक्रम सुरु होता, यावेळी उपायुक्त स्मृती पाटील आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळी उपस्थित होते.
हे ही वाचा : Anjali Damania : ‘शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना पैसै देण्यास भाग पाडले’, फर्नांडिसांना का द्यावे लागले साडे आठ कोटी?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT