Barasu Refinery : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय
उद्धव ठाकरे यांची रानतळे येथे सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
– जमीर खलफे, रत्नागिरी
ADVERTISEMENT
बारसू येथे प्रस्तावित असलेल्या ऑईल रिफायनरी प्रकल्पाविरोधात प्रचंड विरोध होऊ लागला आहे. बारसूसह आजूबाजूच्या गावातील नागरिक बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरले असून, याचे पडसाद राजकारणातही उमटू लागले आहेत. दरम्यान, रिफायनरीला विरोध असलेल्या ग्रामस्थांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. मात्र, ठाकरेंच्या दौऱ्याआधीच पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. (Uddhav thackeray will meet villegers who protest against barasu refinery)
बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण सुरू आहे, तर दुसरीकडे ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र केलं आहे. शनिवारी (6 मे) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारसूला भेट देणार असल्याने त्यांची रिफायनरी समर्थक असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंटचे (फार्ड) पदाधिकारी भेट घेणार आहेत.
हे वाचलं का?
रिफायनरी समर्थक फार्ड उद्धव ठाकरेंना भेटणार; फार्डमध्ये ६३ समर्थक संघटना
ज्या ठाकरेंनीच बारसूची जागा सुचवली आहे तिथे रिफायनरी व्हावी, असे ठाकरे यांना समजावून सांगण्यात येणार आहे. त्यांनी समर्थन द्यावे, अशी मागणी आहे. रिफायनरी समर्थकांची भूमिका पटवून देण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे, अशी माहिती आज फार्डतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जनजागृती संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला फार्डचे अध्यक्ष केशव भट, कोमल सिंग, सचिन शिंदे, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई यांनी संबोधित केले. या वेळी भट यांनी सांगितले, बारसू येथे सध्या शासकीय पातळीवर रिफायनरीकरिता सर्वेक्षण जोरात चालू आहे. तेथे रिफायनरी येणे ही आता निव्वळ एक औपचारिकता उरली आहे.
ADVERTISEMENT
रिफायनरी तेथे येणार या भीतीने रिफायनरीला पूर्वीपासून कोणताही शास्त्रीय आधार न घेता विरोधासाठी विरोध करणारी मंडळी आता आपली अस्तित्वाची लढाई लढत आहेत. यासाठी काही संघटनांनी तेथील असंघटित ग्रामस्थांना हाताशी धरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. एकीकडे बारसू येथील रिफायनरीसाठी आमचा विरोध असणार नाही आणि तेथे रिफायनरी होण्याकरिता मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला तसे लेखी कळवले होते; परंतु आता सरकार बदलल्यानंतर जर भूमिपुत्रांना तेथे रिफायनरी नको असेल तर मी अशी भूमिका घेतली आहे, अशी भूमिका फार्डने मांडली.
ADVERTISEMENT
केशव भट म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फार्डने 20 जून 2019 ला आपल्या 63 समर्थक संघटनांसह 3500 समर्थकांचा मोर्चा काढला होता. जेथे विरोध असणार नाही तेथे रिफायनरीचे स्वागत अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. फार्डने समर्थकांची भूमिका पटवून देण्यासाठी ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट दिली नाही. त्यामुळे ठाकरे 6 मे रोजी बारसूत येणार आहेत, तेव्हा आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. त्यांनी रिफायनरी समर्थकांना भेट द्यावी. आम्ही त्यांच्याशी संवाद साधू.”
उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली
दरम्यान, पोलिसांच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना दौरा आटोपता घ्यावा लागण्याची शक्यता दिसत आहे. उद्धव ठाकरे हे 6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रिफायनरी विरोधी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. प्रशासनाने त्यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधी ग्रामस्थांना भेटण्याची परवानगी दिली आहे. दुसरीकडे याच दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची रानतळे येथे सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT