नववीच्या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका, क्षणात होत्याच नव्हतं झालं, डॉक्टर म्हणाले…
उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील एक धक्कादायक घटना घडली आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला हृदयविकाराचा झटका येऊन तो वर्गातच बेशुद्ध पडला होता. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचारही करण्यात आले.तरीही त्याचा जीव वाचू शकला नाही. तो मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या पालकांनी आता शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT

Student Heart Attack : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील (Uttar pradesh lucknow) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अलिगंजमधील सिटी मॉन्टेसरी स्कुलमधील नवीवमध्ये शिकणारा मुलगा वर्ग चालू असताना हर्ट अटॅक (Heart Attack) आला आणि बेशुद्ध पडला. केमिस्ट्रीचा क्लास चालू असतानाच ही घटना घडल्याने शिक्षकांची तारांबळ उडाली. तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याला टेबलवर झोपवण्यात आले. तरीही तो शुद्धीत आला नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. डाक्टरांनी त्याची तपासणी करुन तात्काळ उपचाराला सुरुवात केली. विद्यार्थ्याला जीवदान देण्यासाठी त्याला कारडीओ पल्मोनरी रिससिटेशन (CPR) देण्यात आला. तरीही विद्यार्थ्याचे प्राण (Student Death) वाचले नाहीत. या घटनेमुळे मात्र अनेकांना धक्का बसला आहे. (uttar pradesh class 9th student suffered heart attack, parents decided postmortem)
वर्गात बेशुद्ध झाला
सिटी मॉन्टेसरी स्कुलमधील केमिस्ट्रीचे शिक्षक नवीन कुमार यांनी सांगितले की, वर्गात मी शिकवत होतो. त्यावेळी अभ्यासातील समस्या मी सोडवून देते होतो. त्यावेळी आतिफ सिद्दीकी अभ्यास करत होतो. त्यावेळी तो अचानक खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर आम्ही त्याला तात्काळ टेबलवर झोपवले आणि शाळेतील नर्सना बोलवून घेतले.
हे ही वाचा >> 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार दिवाळी आधी देणार मोठं गिफ्ट
हृदय बंद पडले
वर्गात नर्स येताच त्यांनी आतिफला रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याची तपासणी करत असताना त्यांना त्याच्या हृदयाची क्रिया बंद असल्याचे लक्षात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून पुन्हा त्याच तपासणी केली असता त्यांनाही हाताची नाडी चालू नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.
शिक्षण आणि नर्सची धावपळ
शाळेत असतानाच विद्यार्थी बेशुद्ध झाल्यानंतर शिक्षक आणि शाळेतील नर्सनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर तात्काळ उपचारही सुरु केले. तरीही तो विद्यार्थी वाचू शकला नाही असं शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कश्यपनी सांगितले. विद्यार्थ्याचे वडिला अन्वर सिद्दीकी यांनी सांगितले की, आतिफ शाळेत बेशुद्ध झाल्यानंतर मला शाळेतून फोन आला. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णालयात दाखलही झालो मात्र आतिफ घेऊन कुणीच आले नव्हते. नंतर आतिफला घेऊन शिक्षक आले तेव्हा त्याची तपासणी केली त्यावेळी त्याचे हृदयाची क्रिया थांबल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हे ही वाचा >> महिला आरक्षण PM मोदी-शाहांची विधानसभा निवडणुकीसाठी खेळी? समजून घ्या
पोस्टमार्टम करण्याचा निर्णय
आतिफचा मृत्यू झाल्यनंतर त्याच्या वडिलांनी शवविच्छेदन करण्याच निर्णय घेतला. कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, मला शिक्षकांवर संशय वाटला. कारण त्यांनी वेगवेगळ्या दोन गोष्टी सांगितल्या. पहिल्यांदा त्यांनी आतिफ ग्राऊंडवर खेळत असताना पडला म्हणून सांगितले आणि दुसऱ्यांदा त्यांनी तो वर्गातच पडल्याचे सांगितले. आतिफ हा हुशार होता आणि त्याला घरात कधी तापही आला नव्हता. त्यामुळे मला संशय वाटला म्हणून मी पोस्टमार्टम घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.