Virar Story: सकाळी बकरी चारायला गेला, परतला तेव्हा करोडपती होऊनच आला!
पश्चिम बंगालमध्ये एक आश्चर्यकारक अशी घटना घडली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून लॉटरी काढणाऱ्या भास्कर माळी व्यक्तीने उधारीवर लॉटरी काढली पण जेव्हा त्याचा निकाल लागला तेव्हा तो करोडपती झाला होता.
ADVERTISEMENT
Viral Story : कधी कोणत्या माणसाचं नशीब चमकेल हे सांगता येणार नाही. कारण नशिबाने एक मजूरी करणारा शेतकरी काही तासातच करोडपती झाला आहे. तो घरातून बाहेर पडला तो आपल्या शेळ्या आणि जनावरांना घेऊन रानात गेला. मात्र जेव्हा तो परत घरी आला तेव्हा मात्र तो करोडपती बनूनच आला होता. ही गोष्ट कल्पनेतील नाही किंवा रचलेलीही नाही. तर अगदी खरीखुरी आहे. कारण ज्या व्यक्तीने 40 रुपयांची लॉटरी (Lottery of Rs.40) घेतली होती, त्या लॉटरीमुळेच तो करोडपती झाला. मात्र वास्तव हे आहे की, ज्या व्यक्तीने 40 रुपयाची लॉटरी घेतली होती, त्यावेळी त्याच्याकडे लॉटरी घेण्यासाठी पैसेही नव्हते. ही घटना घडली आहे ती पश्चिम बंगालमधील (West Bengal) पूर्व बर्दवानमध्ये. काही तासापूर्वी मजूरी करणारी व्यक्ती करोडपती झाली आहे त्या व्यक्तीचं नाव आहे भास्कर माळी.
ADVERTISEMENT
मजूर बनला करोडपती
भास्कर माळी आज करोडपती झाले असले तरी त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजूरी केली आहे. शेळ्या पाळून त्याने दोन वेळच्या जेवणाचीच फक्त सोय होत होती असंही तो सांगतो. फक्त त्याला एक गोष्टीचे व्यसन होते ते म्हणजे लॉटरी खरेदी करणे. मागील 10 वर्षापासून ते लॉटरी खरेदी करतात. तर आता मात्र त्याच लॉटरीने त्यांचे जीवन बदलून गेले आहे.
हे ही वाचा >> Nanded : नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचा थयथयाट! 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू
40 रुपयांची लॉटरी
भास्कर माळींना कायम वाटत होतं की, एक ना एक दिवस लॉटरीने आपले दिवस पालटतील. तो दिवस रविवारी 1 तारखेला अखेर सत्यता उतरला. रविवारी 1 ऑक्टोबर रोजी भास्कर माळी यांनी 40 रुपयांची लॉटरी जिंकून 1 कोटी रुपयांचे मालक झाले आहे. ही घटना गावात पसरताच सगळं गाव आनंदात होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
लॉटरी खरेदीलाही पैसे नव्हते
भास्कर माळी सांगतात की, कधी कधी लॉटरी खरेदीलाही पैसे नसायचे. त्यामुळे घरातही वाद होत होते. कारण घरातील म्हणायचे बाजार खरेदी करायला पैसे नाहीत पण तुम्ही लॉटरी खरेदी करता. ज्या दिवशी ही लॉटरी लागली ती लॉटरी घ्यायलाही भास्कर माळी यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र त्यांनी आपल्या मित्राकडून 40 रुपये घेऊन त्यांनी 60 रुपयांची लॉटरी घेतली. लॉटरी घेतली आणि ते घरातील जनावरांना घेऊन ते रानात गेले. मात्र ते जेव्हा जनावरांना घेऊन घरी परतले तेव्हा मात्र ते करोडपती झाल्याचे त्या लॉटरीने दाखवून दिले होते.
आता घर बांधणार
भास्कर माळी आता करोडपती झाले तरी ते म्हणतात माझं घर मातीचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात घरात सगळं पाणी असतं. त्यामुळे आधी आता घर बांधणार आहे. घराबरोबर आता स्वतःची शेती नाही त्यामुळे आता शेतीसाठीही जमीन घेणार असल्याचे ते सांगतात. तसेच मुलींच्या लग्नासाठीही पैसे ठेवायचे आहेत. हे करत असताना दोन वेळचे जेवण मिळेल अशी व्यवस्था करायची आहे असंही ते सांगतात.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Sanjay Raut : ‘राष्ट्रवादीच्या पे रोलवर काम करणाऱ्यांनी…’, शिंदेंच्या नेत्याचा राऊतांवर पलटवार
दहा वर्षानंतर एक घटना
ज्या लॉटरीवाल्याकडून तिकीट घेतले होते ते सेख मामेझुल म्हणतात की, रविवारी दुपारी एक कोटी रुपयांचे पहिले बक्षीस गावातील भास्कर माळी यांनी जिंकले. ही घटना किमान दहा वर्षानंतर मंगळकोर भागात घडली आहे. या घटनेचा त्यांच्याएवढाच मलाही आनंद झाला असल्याचे मामेझुल सांगतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT