चालत्या बाईकवर त्या जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल, ट्रॅफिक पोलिसांनी काय केलं पाहा
Viral Video : सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जयपूरमधील एका जोडप्याचा रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड वहायरल होतो आहे. चालत्या बाईकवर त्यांनी किस केल्याने हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. त्यातच आता ट्रफिक पोलिसांनी कारवाई केल्याने त्याचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
Viral Video : राजस्थानमधील एका जोडप्याचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जयपूरमध्ये चालत्या बाईकवर रोमान्स करत असलेल्या त्या जोडप्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. रोमान्स करतानाचा हा व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये बाईकवर बसलेले एक मुलगा आणि मुलगी किस करताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
व्हायरल व्हिडीओची चर्चा
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असला तरी ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही यावर्षी होळीदिवशी एका जोडप्याचा बुलेट बाइकवरून जातानाचा असाच व्हिडिओ समोर आला होता. त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली होती.
हे ही वाचा >> IAS टीना डाबी बनल्या आई, जयपूरमध्ये दिला बाळाला जन्म
दुचाकीवर तिघेजण तरीही…
व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ जयपूरच्या सांगानेर भागातील आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण आणि एक तरुणी दुचाकीवरुन जाताना दिसत आहेत. दुचाकीवरील एक तरुण दुचाकी चालवत आहे, तर त्याच्या मागे दुसरा तरुण बसला आहे आणि एक मुलगीही बसली आहे.
हे वाचलं का?
बिनधास्त जोडपे
त्या बाईकवर मागे बसलेले ते जोडपे चालत्या बाईकवर किस घेत आहे. दुचाकीच्या मागे असलेल्या वाहनात बसलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. हे जोडपे दुचाकीवर बिनधास्तपणे किस करत आहेत. त्यानंतर हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा >> फसवणुकीचा अमृतकाल! ‘सामना’तून शिंदे सरकारचे वाभाडे
ट्रॅफिक पोलिसांनी घेतला शोध
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जयपूर ट्रॅफिक पोलिसांना त्या दुचाकीचा शोध घेतला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅफिक पोलीस डीसीपी प्रल्हाद सिंग कृष्णनिया यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे की, दुचाकीच्या नंबर प्लेटच्या आधारे त्यांची ओळख पटवून कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या पथकाने चालकावर एमव्ही कायद्यानुसार कारवाई केली गेली आहे. तसेच त्यांना दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT