Maratha Reservation : रात्री 12 ते पहाटे 3; मनोज जरांगेंनी उपोषण सोडण्यापूर्वी रात्रभर काय घडलं?
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यापूर्वी आंतरवली सराटी गावात रात्रभर काय झालं? सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्या शिष्टमंंडळात काय झाली चर्चा?
ADVERTISEMENT
Maratha Reservation Manoj Jarange News : 01 सप्टेंबर 2023 पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माध्यमांमध्ये मनोज जरांगे पाटील हे नाव झळकतंय. कारण ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत होते, त्याठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी 29 सप्टेंबरपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात उपोषणाला सुरुवात झाली. सरकारकडून काही आश्वासने घेऊनहे उपोषण जरांगे पाटलांनी मागे घेतलं. पण चर्चा झाली ती उपोषण सोडण्याच्या आधीच्या रात्रीची…
ADVERTISEMENT
उपोषण सोडण्यासाठी जरांगे पाटलांनी सरकारसमोर 5 अटी ठेवल्या होत्या. त्यातली एक अट अशी होती की उपोषण सोडतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने हजर राहिलं पाहिजे… मात्र उपोषण सोडतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, राजेश टोपे, नारायण कुचे, अर्जून खोतकर, मनोज जरांगे पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हे सगळं झालं 14 सप्टेंबरच्या सकाळी… मात्र या आधीच्या रात्रीत काय घडलं हे खूप महत्त्वाचं आहे.
मनोज जरांगे उपोषण… अंतरवली सराटीत रात्रभर काय झाली चर्चा
12 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर अटी ठेवल्या. लगेच 13 सप्टेंबरच्या रात्री सरकारचं शिष्टमंडळ अंतरवली सराटी गावात ठाण मांडून बसलं आणि जरांगे पाटलांशी चर्चा करु लागलं. ही चर्चा सुरु झाली 13 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजता अंतरवली सराटीच्या ग्रामपंचायतीमध्ये. बंद दाराआड चर्चा सुरु झाली. ही चर्चा सुरु होती जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आणि आमदार नारायण कुचे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यात… रात्री 1 वाजताच्या दरम्यान चर्चा संपवून शिष्टमंडळ आणि आमदार जरांगे पाटलांना भेटले.
हे वाचलं का?
तिथे अर्धा तास चर्चा झाली. चर्चेनंतर रात्री 1 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान आमदार आणि जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात गेलं. पहाटे 2.30 वाजता सगळं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पोहोचलं. तिथे दानवे यांनी एक चिठ्ठी आपल्या खिश्यातून काढली, त्या चिठ्ठीचा फोटो गिरीश महाजनांनी आपल्याकडे काढून घेतला. त्या चिठ्ठीमध्ये आपण सरकारकडे केलेल्या मागण्यांची नोंद होती, असं स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी दिलं. असं सगळं झाल्यानंतर पहाटे 3 वाजता चर्चा संपली आणि 14 तारखेला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
जरांगे पाटील पुन्हा करणार उपोषण
सरकारसमोर काही अटी ठेवून मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलंय, पण मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर जरांगे पाटील एक महिन्यानंतर पुन्हा सरकारविरोधात आवाज उठवणार असल्याचं स्पष्ट केलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT