आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

what is shree samarth baithak of appasaheb dharmadhikari why millions of shree sevaks believe him
what is shree samarth baithak of appasaheb dharmadhikari why millions of shree sevaks believe him
social share
google news

मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikar) यांना मानाचा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उष्माघातामुळे श्रीसेवकांचा मृत्यू झाल्यानं या कार्यक्रमाला गालबोटही लागलं. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात हे अनुयायी आप्पासाहेब धर्माधिकारींना का मानतात? आप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत? त्यांचं कार्य काय? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (what is shree samarth baithak of appasaheb dharmadhikari why millions of shree sevaks believe him)

ADVERTISEMENT

कोण आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय?

आप्पासाहेब धर्माधिकारी ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र आहेत. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 साली श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. या माध्यमातून श्रीसमर्थ बैठकांना सुरुवात झाली. मुंबईतील गोरेगावला पहिली बैठक पार पडली. नानासाहेबांनी रामदास स्वामींच्या दासबोधाचं सोप्या शब्दांत निरुपण करायला सुरुवात केली. यातून श्रीसेवकांचं प्रबोधन होऊ लागलं. नानासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.

नानासाहेबांचा हाच वारसा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे नेला आणि त्याची व्याप्तीही वाढवली. अप्पासाहेबांनी रेवदंडा येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले. वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, विहिरी पुनर्भरण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती अभियान, बालसंस्कार वर्ग, शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमांद्वारे लाखो श्रीसेवक आप्पासाहेबांच्या कार्याशी जोडले गेले. पर्यावरण, पाणी, आरोग्य, स्वच्छता, आरोग्य, रोजगार अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आखले जातात आणि त्या माध्यमातून श्रीसेवकांना मार्गदर्शन केलं जातं.

श्री समर्थ बैठक म्हणजे काय?

नानासाहेब धर्माधिकारी आणि सुरुवातीच्या काळात आपल्या ओघवत्या वाणीने निरुपणाला सुरुवात करत बैठकीची स्थापना केली होती. यावेळी नानासाहेबांनी प्रामुख्याने ग्रामीण भागातील अशिक्षित, व्यसनाच्या आहारी गेलेल्या आणि अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या लोकांना आपल्या निरुपणाच्या माध्यमातून समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

हे देखील वाचा- महाराष्ट्रात राजकारण पेटलं, 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अखेर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सोडलं मौन

हळूहळू याची व्याप्ती प्रचंड वाढत गेली. त्यानंतर राज्यभरात तालुका-तालुक्यात बैठक स्थापना झाली. त्यानंतर देशभरात आणि परदेशात देखील समर्थ बैठकींना सुरुवात झाली.

ADVERTISEMENT

बैठकीत नेमकं कशावर होतं निरुपण?

समर्थ बैठकीत दिलं जाणारं निरुपण हे प्रामुख्याने समर्थ रामदासरचित दासबोधावर असतं. यामधील प्रत्येक समासावर आठवड्यातील एक दिवस निरुपण केलं जातं. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या बैठक असतात. तर लहान मुलांसाठी बालभक्ती बैठकही असते.
काम-क्रोध अशा सात विषय-विकारांवर प्रामुख्याने निरुपण केलं जातं. प्रत्येकाने मनातील विषय-विकारांचा त्याग करून निर्मळपणे वागावं असं या निरुपणांमधून सांगितलं जातं. अनेक श्री सदस्यांचा असा दावा आहे की, जेव्हा पासून ते बैठकीला जाऊ लागले आहेत तेव्हापासून ते व्यसनांपासून मुक्त झाले आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस बैठकीच्या श्री सदस्यांची संख्या ही वाढतच चालली आहे.

what is shree samarth baithak of appasaheb dharmadhikari why millions of shree sevaks believe him
 

आप्पासाहेब देखील निरुपणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, स्त्रीसन्मान, हुंडाप्रथा याबाबत प्रबोधन करतात. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूरसारख्या देशात त्यांच्या बैठका होतात. महाराष्ट्रातील खेडोपाड्यांसह आदिवासींच्या विकासासाठी त्यांच्या पाड्यांवर बैठकांसह विविध कार्यक्रमांचं विशेष आयोजन केलं जातं. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या विविध स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीरांच्या कार्यक्रमांचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही झाले आहेत.

श्री सदस्यांच्या घरोघरी अधिष्ठान, नेमकं काय असतं?

कोणत्याही आध्यात्मिक बैठकीला एखाद्या अधिष्ठानाची आवश्यकता असते. त्यामुळेच जेव्हापासून धर्माधिकारींनी समर्थ बैठकीला सुरुवात केली तेव्हाच त्यांनी एकमुखी दत्त असलेल्या अधिष्ठानाची स्थापना केली. ज्यानंतर हळूहळू श्री सदस्यांच्या घरी देखील अधिष्ठानाची स्थापना होऊ लागली. या अधिष्ठानात झाडाखाली बसलेले एकमुखी दत्त असलेला एक फोटो असतो.

हे देखील वाचा- महाराष्ट्र भूषण सोहळा: 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अमित शाहा म्हणाले, माझं मन…

या अधिष्ठानाची बैठकीतील श्री सदस्यांच्याच मार्फत विधिवत स्थापना केली जाते. ज्या श्री सदस्याच्या घरी ही स्थापना असते त्याला दररोज न चुकता त्या अधिष्ठानाची पूजा करावी लागते. यावेळी पुजेदरम्यान, त्यांना एकमुखी दत्ताच्या चरणी चंदनलेप असलेलं तुळशीपत्र देखील लावावं लागतं.

मात्र हे अधिष्ठान प्रत्येक श्री सदस्याला मिळतेच असे नाही. यासाठी बैठकीत जाणाऱ्या श्री सदस्यांना एक विशिष्ट निवेदन द्यावं लागतं. त्या निवेदनाला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्याकडून मान्यता मिळते त्यानंतरच संबंधित श्री सदस्यांच्या घरी अधिष्ठानाची स्थापना केली जाते.

नानासाहेब धर्माधिकारींना देखील मिळालेला महाराष्ट्र भूषण

नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 25 नोव्हेंबर 2008 ला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आप्पासाहेबांनी तो पुरस्कार स्वीकारला होता. त्या सोहळ्याला तब्बल 40 लाख श्रीसेवकांची उपस्थिती होती. त्या सोहळ्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.

हे देखील वाचा- Appasaheb Dharmadhikari: 12 श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणात राज ठाकरेंनी शिंदे सरकारला दिली क्लीन चीट, Tweet मध्ये काय?

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही अनेक मोठ्या सन्मानांनी गौरवण्यात आलंय.

  • आप्पासाहेबांना 2017 साली मानाच्या पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
  • डी.वाय पाटील विद्यापीठानं 2014 मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट पदवीनं गौरव केला
  • युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीनं त्यांना 2022 साली लिव्हिंग लिजंड पुरस्कारानं सन्मानित केलं.
  • महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या याच कार्यामुळे त्यांना मानणाऱ्या श्रीसेवकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या याच कार्यामुळे ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे भूषण आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT