जेजुरी विश्वस्त वाद : 5 माणसांमुळे जेजुरीकर भडकलेत, समजून घ्या वाद काय?
मार्तंड देवस्थान विश्वस्त समितीवर सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या 7 जणांपैकी पाच जण जेजुरीबाहेरील असून, त्यांना ग्रामस्थांचा विरोध होत आहे. काय संपूर्ण प्रकरण?
ADVERTISEMENT
Row over Jejuri Temple Trustees : अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असं कुणी म्हणालं, तर कुणाच्या तोंडून शब्द निघतात खंडेरायाची जेजुरी! मल्हारी मार्तंडाची हीच जेजुरी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत आहेत. याच कारण आहे मार्तंड देवस्थान समितीवर (shri khandoba mandir) करण्यात आलेल्या विश्वस्तांच्या नियुक्त्या. या नियुक्त्यांविरोधात जेजुरीकर एकवटले आहेत आणि साखळी उपोषणही सुरू केलं आहे. जेजुरीतील नागरिकांचा या नियुक्त्यांना विरोध का होतोय आणि विरोध असलेले पाच माणसं कोण, हेच समजून घेऊयात… (jejuri temple news today)
ADVERTISEMENT
मार्तंड देवस्थान समितीच्या मागील विश्वस्तांचा कार्यकाळ डिसेंबर 2022 मध्ये संपला. त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून निविदा प्रसिद्ध करून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 500 पेक्षा अधिक अर्ज सादर झाले होते. त्यापैकी 85 अर्ज अपात्र ठरविण्यात आले, तर 350 पेक्षा अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात घेतल्या गेल्या होत्या.
jejuri trustees controversy : वाद कसा सुरू झाला?
निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विश्वस्त म्हणून शहरातील किमान 4 जणांची निवड करावी, अशी मागणी शहरातील अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. मुलाखतीवेळी जेजुरी गडाला पायऱ्या किती? देवांची भूपाळी-आरती येते का? तसेच गाभाऱ्यात मूर्ती किती आहेत? यात्रा उत्सवांचे महत्त्व काय? असे मार्तंड देवस्थानाशी निगडित अनेक प्रश्न उमेदवारांना विचारण्यात आले होते.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Appasaheb Dharmadhikari: ‘त्या’ दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत आप्पासाहेबांचा मोठा निर्णय
पण, नंतर जेजुरीकर ग्रामस्थांना डावलून पुणे जिल्ह्यातील इतर ठिकाणचे रहिवासी असलेल्या 5 व्यक्तींना निवडण्यात आले. त्यांची निवड कोणत्या निकषावर करण्यात आली? आणि मंदिरावर स्वतःच्या पक्षाची पकड राहावी म्हणून निवड प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप केला आहे, असा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे.
जेजुरी वाद : नवे विश्वस्त कोण?
अभिजीत अरविंद देवकाते (बारामती)
ADVERTISEMENT
राजेंद्र बबन खेडेकर (कोथरूड)
ADVERTISEMENT
मंगेश अशोक घोणे (जेजुरी)
विश्वास गोविंद पानसे (बारामती)
अनिल रावसाहेब सौदाडे
पांडुरंग ज्योतिबा थोरवे (बालेवाडी)
पोपट सदाशिव खोमणे (जेजुरी)
हेही बघा >> Crime Story: साक्षीला साहिलने का मारलं दिल्लीत घडलेल्या त्या निर्घृण हत्येमागे कारण काय?
नियुक्त करण्यात आलेल्या सात विश्वस्तांपैकी 2 विश्वस्तच जेजुरीतील आहेत. इतर विश्वस्त हे पुणे जिल्ह्यातील असले तरी जेजुरीबाहेरील आहेत. त्यामुळेच ही वादाची ठिणगी पडली आहे.
ग्रामस्थ आक्रमक
नव्या विश्वस्तांच्या नियुक्त्यांनंतर जेजुरीतील ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी पुणे-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी निवडलेल्या विश्वस्त मंडळास सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. पण, प्रशासनाकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा बुधवारी (31 मे) सहावा दिवस आहे. त्यास ग्रामस्थ, विविध संघटना, गणेश मंडळे आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT