Cyclone: 2 चक्रीवादळं कुठे धडकणार, ‘तेज’ चक्रीवादळ येणार मुंबईच्या दिशेने?
2 Cyclone Update: अरबी समुद्रातलं चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने येण्याचा धोका आहे का? दोन्ही चक्रीवादळांचा भारतीय किनारपट्टीला किती धोका आहे? जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
Mumbai Cyclone: मुंबई: मान्सून (Monsoon) संपला असतानाच आता दोन चक्रीवादळाचं (cyclone) संकट घोंगावतं आहे. अरबी समुद्रासोबत (Arabian Sea) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होतं आहे. दोन्ही चक्रीवादळं कोणत्या दिशेने जाणार? चक्रीवादळ नेमके कधी आणि कुठे धडकणार? अरबी समुद्रातलं चक्रीवादळ मुंबईच्या (Mumbai) दिशेने येण्याचा धोका आहे का? दोन्ही चक्रीवादळांचा भारतीय किनारपट्टीला किती धोका आहे? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (where 2 cyclones will hit tej cyclone will come towards mumbai maharashtra weather update)
ADVERTISEMENT
‘तेज’ चक्रीवादळ वेगाने सरकतंय पुढे…
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्टोबरला अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप परिसरात चक्राकार वारे तयार झाले आहेत. 18 ऑक्टोबरला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून 21 ऑक्टोबरला दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे मान्सूननंतरचं पहिलं चक्रीवादळ असून आता ते ‘तेज’ नावाने ओळखलं जाईल. सध्या हे चक्रीवादळ 30-40 किमी प्रतितास वेगानं पुढे सरकतं आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील ‘तेज’ या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला कुठलाही धोका नाही. तेज चक्रीवादळ 21 ऑक्टोबरला मध्य अरबी समुद्रात तयार झाल्यानंतर पुढील काही तासांत अधिक तीव्र होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेला सरकत जाऊन ओमान ते येमेनच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Cyclone: 2 चक्रीवादळांचं संकट घोंगावतंय, मुंबईसह महाराष्ट्राला किती धोका?
‘तेज’ चक्रीवादळ 23 ऑक्टोबरला येमेनच्या किनारपट्टीजवळ धडकण्याची शक्यता आहे. पण, यामध्ये आणखी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर दिशा बदलून गुजरात किंवा पाकिस्तानच्या दिशेने देखील जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. पण, चक्रीवादळ दिशा बदलण्याची शक्यता फारच कमी आहे, असंही स्कायमेटनं म्हटलं आहे. चक्रीवादळ येमेनच्या दिशेने जाणार असलं तरी यामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसऱ्या चक्रीवादळाची धडक कुठे बसणार?
अरबी समुद्रासोबत बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमानजवळ 17 ऑक्टोबरला चक्राकार वारे तयार झाले. हे चक्राकार वारे पश्चिम-उत्तर पश्चिम दिशेने सरकत जाऊन 21 ऑक्टोबरला कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल. त्यानंतर 23 ऑक्टोबरला पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ अधिक तीव्र असेल आणि याचा फटका भारतीय किनारपट्टीसोबतच बांगलादेशच्या किनारपट्टीलाही बसण्याची दाट शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> PSI Somnath Zende : Dream 11 वर 1.5 जिंकलेल्या PSI झेंडेंना 2 चुका भोवल्या, मोठी कारवाई
हे चक्रीवादळ 24 ऑक्टोबरला विशाखापट्टणमजवळ धडकून पुढील 24 तास किनारपट्टी भागातूनच ओडिशा आणि बांगालदेशच्या दिशेने प्रवास करेल. त्यामुळे या चक्रीवादळाचा आंध्रप्रदेश आणि ओडिशाला सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT