Chandrayaan-3: चंद्रयान चंद्रावर का जाऊ शकत नाही, पृथ्वीभोवती घिरट्या का घालतंय…
भारताने नुकतंच 14 जुलैला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3)चंद्राच्या दिशेने पाठवले होते. हे अंतराळ यान आता 42 दिवसांनी चंद्रावर पोहोचवणार आहे.
ADVERTISEMENT
भारताने नुकतंच 14 जुलैला श्रीहरिकोटा (shriharikota) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (satish dhavan space center) दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3)चंद्राच्या दिशेने पाठवले होते. हे अंतराळ यान आता 42 दिवसांनी चंद्रावर पोहोचवणार आहे. त्यामुळे याला बराच कालावधी लागणार आहे. दरम्यान एकीकडे नासा 4 दिवसात चंद्रावर पोहोचत असताना भारताची अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) 42 दिवस का लागतात? तसेच अंतराळ यान थेट चंद्रावर का पाठवले जात नाही? अंतराळ यानाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून का जावे लागते? असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. याच प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात. (why chandrayaan 3 orbit the earth before being launched to moon)
ADVERTISEMENT
पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून अंतराळयान खोल अवकाशात पाठवण्याची प्रक्रिया स्वस्त असते. तसेच इतर देशांच्या तुलनेत भारताचे बजेट देखील कमी असते, त्यामुळे भारताकडून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालून अंतराळयान खोल अवकाशात पाठवले जाते. तसेच इस्त्रो थेट चंद्रावर अंतराळ यान पाठवू शकतो पण नासाचे तुलनेत इस्त्रोचे प्रोजेक्ट फारच स्वस्त असतात. तसेच नासाप्रमाणे इस्त्रोकडे मोठे आणि ताकदवार रॉकेट नाही आहेत, ज्यामुळे ते चंद्रयानला थेट चंद्रावर पाठवू शकतात. असे रॉकेट बनवण्यासाठी हजारो-करोड रूपयांची गरज असते.
हे ही वाचा : Seema Haider : ’72 तासांत सीमाला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर…’, कुणी दिली धमकी?
इस्त्रो मिशन तुलनेत स्वस्त
जगभरातील इतर देशातील अंतराळ मिशनबद्दल बोलायचं झालं तर…चीनने 2010 साली चांगई-2 थेट चंद्रावर पाठवला होता. हे यान फक्त चार दिवसात चंद्रावर पोहोचले होते. त्याचबरोबर सोविएत संघाचा पहिल लूनार मिशन 1 दिवस 36 तासात चंद्राच्या जवळ पोहोचला होता.अमेरीकेचे अपोलो 11 कमांड मॉड्युल कोलंबियात तीन अंतराळवीरांना घेऊन चार दिवसाहून अधिक वेळ घेऊन चंद्रावर पोहोचले होते. चीन, अमेरीका आणि सोविएत संघाने हे अतंराळयान चंद्रावर पाठविण्यासाठी मोठ्या रॉकेट्सचा वापर केला होता.
हे वाचलं का?
किती खर्च झाला?
चीनने चांगई मिशनसाठी चीन चांग झेंग 3 सी रॉकेटचा वापर केला होता.या मीशनसाठी चीनने 1026 करोड रूपये खर्च केले होते. स्पेसएक्सच्या फॉल्कन 9 रॉकेटच्या लॉंचिंगची किंमत 550 करोड ते 1000 करोड पर्यंत असते. त्या तुलनेत भारताच्या इस्त्रोच्या रॉकेट लॉंचिंगची किंमत 150 ते 450 करोड पर्यंत आहे.
अंतरिक्ष यानात इंधनाची मात्रा खुपच कमी असते. या इंधनाचा वापर दिर्घकाळापर्यंत करायचा असतो. त्यामुळे अंतराळ यानाला थेट चंद्रावर पाठवता येत नाही. कारण यामध्ये संपूर्ण इंधन संपण्याचा धोका असतो आणि मिशन अपुर्ण राहते. त्यामुळे पृथ्वीभोवती अंतराळ यान फिरवताना कमी इंधन वापरून यान पुढे सरकवले जाते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई ते चंद्रपूर… सेल्फीने ढकललं मृत्यूच्या जबड्यात! कुणी आई गमावली, तर कुणी तरूण मुलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT