मायबापाच्या शोधात स्वित्झर्लंडहून मुंबईला आली, पण नंतर जे कळलं त्यामुळे धक्काच बसला!
एक तरूणी तिच्या आई-वडिलांच्या शोधात स्वित्झर्लंडहून मुंबईला आली. 1998 मध्ये स्वित्झर्लंडच्या एका नागरिकाने तिला दत्तक घेतले. तेव्हापासून ती तिथेच राहत होती. गेल्या काही वर्षांत ती सहा वेळा मुंबईत आली असून तिच्या कुटुंबाचा शोध घेत आहे.
ADVERTISEMENT
Mumbai News : एक तरूणी तिच्या आई-वडिलांच्या शोधात स्वित्झर्लंडहून मुंबईला आली. 1998 मध्ये स्वित्झर्लंडच्या एका नागरिकाने तिला दत्तक घेतले. तेव्हापासून ती तिथेच राहत होती. गेल्या काही वर्षांत ती सहा वेळा मुंबईत आली असून तिच्या कुटुंबाचा शोध घेत आहे. यादरम्यान तिला अशी काही माहिती मिळाली की तिच्या पायाखालची जमीनच सरकली. (young woman came to Mumbai from Switzerland in search of her parents but what was revealed later and she shocked)
ADVERTISEMENT
स्वित्झर्लंडमध्ये राहणारी मिरांडा पिंकी आपल्या आई-वडिलांच्या शोधात मुंबईत पोहोचली आहे. ती मुळात भारतीय आहे. 1998 मध्ये स्विस नागरिकाने तिला मुंबईतील अनाथाश्रमातून दत्तक घेतले. तेव्हापासून ती स्वित्झर्लंडमध्ये राहते.
वाचा : Crime : ज्याच्यासाठी मायबापाला सोडलं, त्यानेच मित्रांसोबत मिळून केला गँगरेप
लहान वयातच अनाथाश्रमात सोडले होते
मिरांडा पिंकीला तिच्या खऱ्या पालकांबद्दल काहीच माहिती नाही. तिला लहान वयातच अनाथाश्रमात सोडण्यात आले. तेथे काही वर्षे राहिल्यानंतर ती आपल्या नवीन कुटुंबासह स्वित्झर्लंडला गेली. आता ती तिच्या आई-वडिलांच्या शोधात भारतात आली आहे.
वाचा : मोदींची शरद पवारांवर टीका, उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
पिंकी एका संस्थेच्या मदतीने परिसरात पोहोचली
गेल्या काही वर्षांत ती सहा वेळा भारतात आली आहे. बालपणीच्या आठवणी आणि एका संस्थेच्या मदतीने ती मुंबईतील एका भागात पोहोचली. ती तिच्या आई-वडिलांच्या शोधात व्यस्त आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे अनाथाश्रमातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे तिच्या पालकांची नावे सापडली.
वाचा : Devendra Fadnavis : ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओ भाजपने पुन्हा टाकला, कारण आलं समोर
यानंतर पिंकीलाही मोठा धक्का बसला आहे. तिला कळलं की तिची खरी आई आता या जगात नाही. पिंकीच्या म्हणण्यानुसार, ती लहान असताना ती कामाठीपुरा येथे राहत होती, जिथे हजारो महिला छोट्या गल्ल्यांमध्ये राहत होत्या. तिथही छोट्याशा खोलीशी तिच्याही आठवणी जोडलेल्या आहेत.
ADVERTISEMENT
यावेळी पिंकीला तिची आई हयात नसल्याचं कळलं. पण वडील कोण होते, कुठे राहतात याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. जोपर्यंत ती तिच्या कुटुंबीयांना भेटत नाही तोपर्यंत शोध सुरूच राहणार असल्याचे पिंकीचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT