Cyber Crime: तुम्हीही सतत पॉर्न पाहता?, एक Email अन् तुमचा खेळ खल्लास!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

adult website watchers cheated by cyber criminals know how the game of blackmailing is going on crime news
adult website watchers cheated by cyber criminals know how the game of blackmailing is going on crime news
social share
google news

Cyber Crime News: मुंबई: पॉर्न व्हिडीओ पाहणं हे अनेकांना प्रचंड महागात पडू शकतो. कारण फसवणुकीला बळी पडून तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे गमावू शकता. सायबर चोरांनी आता लोकांची फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. सायबर गुन्हेगार हे धमकीचे ई-मेल पाठवून पॉर्न साइट पाहणाऱ्यांची फसवणूक करत असल्याचं आता समोर आलं आहे. (adult website watchers cheated by cyber criminals know how the game of blackmailing is going on crime news)

ADVERTISEMENT

वास्तविक, सायबर गुन्हेगार भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या नावाने धमक्या देणारे मेल पाठवतात आणि पॉर्न साइट पाहणाऱ्यांना ब्लॅकमेल करतात. त्यानंतर त्यांच्याकडे लाखो रुपयांची मागणी करतात आणि पैसे न दिल्यास ते सायबर पोलीस अधिकारी बनून कठोर कारवाई करण्याची धमकी देतात. अशा काही वेबसाइट्स देखील आहेत, ज्याच्या लिंकवर क्लिक केल्यावर सायबर गुन्हेगार हे यूजर्सचे तपशीलही मिळवितात आणि ते सहजपणे त्यांना आपली शिकार बनवतात.

सायबर गुन्हेगार असे मेल पाठवून घाबरवतात

सायबर पोलीस अधिकारी बनून मेल लिहितात की, “हा ई-मेल भारतीय फौजदारी संहितेच्या कलम 14, 292, 66 A, POCSO कायदा 2012 आणि माहितीच्या तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 67 अंतर्गत किशोरवयीन पोर्नोग्राफीचे प्रकाशन किंवा प्रसारण गुन्हा मानला जातो. मला तुमची केस फाईल तात्काळ खटल्यासाठी न्याय अभियोजकांकडे हस्तांतरित करण्यापूर्वी आणि 24 तासांच्या आत योग्य निर्बंध लादण्यापूर्वी तुम्हाला कळवणे योग्य वाटले, तुम्ही या संदेशाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि पुढील पुनरावलोकनासाठी तुमचे समर्थन स्पष्ट केले पाहिजे.

हे वाचलं का?

त्याच वेळी, जर तुम्ही 24 तासांच्या आत उत्तर देऊ शकत नसाल, तर तुमच्या विरुद्ध अटक वॉरंट जवळच्या पोलीस स्टेशनमधून फिर्यादीकडे पाठवले जाईल आणि तुमची माहिती राष्ट्रीय लैंगिक गुन्ह्यांसाठी नोंदणी करण्यासाठी आणि प्रकाशनासाठी पाठवली जाईल. असे मेल आल्यानंतर लोक घाबरतात आणि सहज फसवणुकीला बळी पडतात आणि लाखो रुपयांचे नुकसान होतं

सायबर पोलिसांकडे तक्रार

सायबर पोलीस ठाण्यात अनेक दिवसांपासून असे ई-मेल पाठवल्या जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, तो बनावट ई-मेल असल्याचे निष्पन्न झाले. इंटरनेट यूजर्सची फसवणूक करण्याचा हा नवा मार्ग आता सायबर गुन्हेगारांनी शोधल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी हे गुन्हेगार व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलद्वारे लोकांना कॉल करायचे, त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करायचे आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन फसवणूक करायचे. मात्र आता कडक कारवाईची धमकी देऊन फसवणूक केली जात आहे.

ADVERTISEMENT

‘घाबरण्याऐवजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा’

असा कोणताही ई-मेल आल्यास घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन पोलिसांनी जनतेला केले आहे. याबाबत तुम्ही जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करू शकता, जेणेकरून अशा सायबर गुन्हेगारांवर वेळीच योग्य ती कारवाई करता येईल आणि इतर लोकांची फसवणूक होणार नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT