कळंबमधील 'त्या' महिलेचा मृतदेह सापडला, पुरावा संपवला? एकाला अटक, संतोष देशमुख प्रकरणाशी कनेक्शन?

सुधीर काकडे

Kalambh Woman Murder: मनीषा कारभारी-बिडवे ही अंदाजे 40 ते 45 या वयाची महिला कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत राहत होती. काही वर्षांपासून ही महिला एकटीच इथे राहत होती. तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कळंबमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

point

संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी हीच महिला वापरली जाणार होती?

point

दोन्ही घटनांचा संबंध काय? पोलिसांनी काय सांगितलं?

Beed News : बीडमध्ये 9 डिसेंबर 2024 ला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या प्रकरणात अनेक नव्या गोष्टी नाट्यमयरित्या समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी केलेला निष्काळजीपणा, आरोपींना वाचवण्यासाठी केलेले कट आहे देशमुख कुटुंबाने, सुरेश धस यांनी समोर आणले आहेत. तसंच गावातील लोकांनी केलेल्या आरोपांनुसार "आरोपी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह एका महिलेच्या घरी नेऊन टाकणार होते आणि या प्रकरणाला बलात्काराचं वळण देणार होते." या आरोपादरम्यान, कळंबमधील महिलेचा वारंवार उल्लेख झाला होता. त्यानंतर आता कळंबमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे या प्रकरणामधील गुंतागूंत आणखी वाढली आहे. 

कळंबमध्ये सापडला महिलेचा मृतदेह 

कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये गुरुवारी एका महिलेचा मृतदेह तिच्याच घरात आढळळा. हा मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत घराच्या एका खोलीत पडलेला होता. मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला बीड जिल्ह्यातील आडस गावची रहिवासी असून, तिचं माहेर अंबाजोगाई तालुक्यातील टाकळी मनोहर हे आहे. महिलेच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एक संशयित आरोपी देखील ताब्यात घेतला आहे. एका आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.   5 ते 6 दिवस  या महिलेचा मृतदेह घरात पडून होता. त्यानंतर शेजाऱ्यांना वास यायला लागला. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला.

काय आहे प्रकरण?

हे ही वाचा >> Kunal Kamra : मुंबई पोलीस 'त्या' घरी पोहोचले, कुणाल कामरा म्हणाला, "मी 10 वर्षांपासून..."

मनीषा कारभारी-बिडवे अंदाजे 40 ते 45 या वयाची महिला कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत राहत होती. काही वर्षांपासून ही महिला एकटीच इथे राहत होती. बुधवारी शेजाऱ्यांना वास येऊ लागला. सुरूवातीला प्राण्याचा मृत्यू झाला असेल, या विचाराने शेजारच्या लोकांनी दुर्लक्ष केलं. मात्र गुरुवारी मृत महिलेच्या घराकडून हा वास जास्त उग्र स्वरुपात यायला लागल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. बाहेरून कुलूप असल्यानं पोलिसांनी मागच्या बाजूने किचनमध्ये प्रवेश केला असता, डोक्याला मार लागलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला. 

एका आरोपीला अटक 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही घरात एकटी राहत होती. द्वारका नगरी वसाहतीतील लोकांचा आणि तिचा फारसा संपर्क नव्हता. ती खासगी सावकारकी करायची. काही लोकांचं तिच्या घरी येणंजाणं होतं. रात्री अपरात्री कधीही तिच्या घरी काही लोक येत असल्याचं परिसरातील लोकांनी सांगितलं. त्याचबरोबर तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा, अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तिचं नाव रामेश्वर भोसले आहे असंही समोर आलंय. 

देशमुखांना अडकवण्यासाठी याच महिलेला तयार केलं होतं? 

दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर आता संतोष देशमुख यांना अडवण्यासाठी जी महिला तयार करण्यात आली होती, तीच ही महिला असल्याची चर्चा सुरू आहे. "संतोष देशमुखावर अनैतीक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतंय.  या महिलेची 7 ते 8 दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.  कुठल्या कारणाने हत्या झाली अन् बीड पोलीसांना ही बातमी कळाली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलीसाना कळाली. अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे." असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा >> 'संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेचा खून?', संपूर्ण प्रकरण जसंच्या तसं

धनंजय देशमुख महिलेच्या मृत्यूवर काय म्हणाले? 

मी वेळोवेळी सांगत आलो आहे केज स्टेशन मध्ये पहिल्या आठ दिवसाचा तपासाचे री इन्वेस्टीगेशन करावं. त्याच्यातलाच हा एक भाग आहे. हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी एक महिला तयार केली गेली होती. ही आरोपींनी तयार केलेली महिला होती. त्याच्या अगोदर या गोष्टीमुळे कित्येक जण बळी पडले असतील, मात्र पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही.  त्या महिलेचा कुणीतरी खून केल्याची माहिती आली आहे. याला कारणीभूत कोण आहे आता याची जबाबदारी कोण घेईल? याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत. 

पोलीस म्हणाले काहीही संबंध नाही


मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी फेटाळली आहे. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर पोलिसांनी या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नसल्याची माहिती दिली आहे. पोलीस विभागाकडे याबाबत कुठलीही माहिती नाही. अंजली दमानिया यांना चुकीची माहिती मिळाली असेल, त्यावर आम्ही काय बोलणार असं कळंबमधील पोलीस निरीक्षक रवी सानप म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp