हॉटेलमध्ये मालकासोबत एन्ट्री नंतर चादरीत गुंडाळलेला मृतदेह… मॉडेल दिव्या हत्याकांडाचं गँगस्टर कनेक्शन?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Divya Pahuja Murder Case Seen Reception Hotel owner and Staff took away her body revelation in cctv Possible Connection with gangster Sandeep Gadoli
Divya Pahuja Murder Case Seen Reception Hotel owner and Staff took away her body revelation in cctv Possible Connection with gangster Sandeep Gadoli
social share
google news

Divya Pahuja Murder Case : गुरुग्राममधून (Gurugram) हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी 27 वर्षीय प्रसिद्ध मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हिची हत्या करण्यात आली आहे. सिटी पॉइंट हॉटेलमध्ये 2 जानेवारी रोजी ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. (Divya Pahuja Murder Case Seen Reception Hotel owner and Staff took away her body revelation in cctv Possible Connection with gangster Sandeep Gadoli)

ADVERTISEMENT

सीसीटीव्हीत (CCTV) 2 जानेवारीला पहाटे 4.18 वाजता तीन जण हॉटेलमध्ये शिरल्याचे दिसले. ते दुसरे-तिसरे कुणी नसून हॉटेल मालक अभिजीत, मॉडेल दिव्या पाहुजा आणि त्यांच्यासोबत आणखी एक तरुण होता. तिघेही हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचले, काही वेळ तिथे त्यांचं बोलणं झालं आणि नंतर ते आत गेले.

वाचा : Jitendra Awhad : पवारांच्या दोन नेत्यांमध्ये ठिणगी; आव्हाडांचं रोहित पवारांना खरमरीत उत्तर

त्यानंतर साडेअठरा तासांनंतर म्हणजेच 2 जानेवारी रोजी रात्री 10.44 वाजता दोन तरुणांनी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह बाहेर ओढून नेला. हा मृतदेह दिव्या पाहुजाचा होता. यानंतर आरोपींनी दिव्याचा मृतदेह DD03K240 क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू कारच्या डिग्गीत टाकून तिथून पळ काढला. मात्र, दिव्याचा मृतदेह आरोपींनी कुठे नेला याबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळालेली नाही. पोलीस तपास करत आहेत.

हे वाचलं का?

दिव्या पाहुजा गँगस्टर संदीप गडोली एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित आहे. दिव्याच्या बहिणीने या घटनेमागे गडोलीचा भाऊ ब्रह्मप्रकाश याचा कट असल्याचे सांगितले आहे. दिव्या पाहुजाच्या बहिणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2 जानेवारी रोजी सकाळच्या वेळी तिचं दिव्याशी बोलणं झालं होतं, पण रात्री दिव्याचा नंबर अनरिच दाखवत होता. त्यामुळे तिच्या मनात संशय निर्माण झाला. तिने हॉटेल मालक अभिजीतला फोन केला. पण दिव्याबद्दल काहीही सांगण्यास तो टाळाटाळ करत होता.

पण आता गुन्हे शाखेने अभिजीत, ओमप्रकाश आणि हेमराज अशा तिघांना अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अभिजीत हा हॉटेलचा मालक आहे, तर प्रकाश आणि इंद्रज हे हॉटेलमध्ये काम करतात. त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास अभिजीतला मदत केली.

ADVERTISEMENT

वाचा : Jitendra Awhad : “मी एवढंच बोलेन की…”, आव्हाडांनी व्यक्त केला खेद, काय बोलले?

पोलिसांनी सांगितले की, ही घटना 2 जानेवारी रोजी रात्री उशिरा सेक्टर 14 पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जिथे पोलिसांना माहिती मिळाली की, बलदेव नगर, गुरुग्राम येथे राहणारी 27 वर्षीय तरुणी दिव्या पाहुजा, दिल्लीतील व्यापारी आणि सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजीतसोबत फिरायला गेली होती.

ADVERTISEMENT

गँगस्टर संदीप गडोलीशी दिव्याचं कनेक्शन काय?

खरं तर, एकेकाळी दिव्याचे गँगस्टर संदीप गडोलीसोबत प्रेमसंबंध होते. संदीप तिच्यावर प्रेम तर करायचा, पण पाणउतारा करायलाही मागेपुढे पाहायचा नाही. या गोष्टीने ती कंटाळली होती. हे प्रकरण 2016 चे असून दिव्याचे वय 20 वर्षे होते. त्यावेळी गँगस्टर संदीप दिव्यासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे पोहोचून संदीप गडोलीचा एनकाउंटर केला. स्वतः दिव्यानेच पोलिसांना संदीपबद्दल माहिती दिली होती, असे म्हटले जाते, पण असाही प्रश्न पडतो की दिव्याने संदीपची माहिती का दिली?

वाचा : Jitendra Awhad : रोहित पवारांचा आव्हाडांना डोस; म्हणाले, “नको त्या…”

मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिव्याला 7 वर्षांचा तुरुंगवास

या प्रकरणात दिव्या ही प्रत्यक्षदर्शी मुख्य साक्षीदार होती, त्यामुळे तिला साक्षीदार करण्यात आले. मात्र मुंबई पोलिसांना हरियाणा पोलिसांची थिअरी पटली नाही. त्यांनी दिव्या, तिची आई आणि पोलिसांविरुद्ध बनावट एनकाउंटरचा गुन्हा दाखल केला. यानंतर दिव्याने 7 वर्षे तुरुंगात काढली. तिचे कुटुंबही तुरुंगात होते.

तुरूंगवासानंतर दिव्याच्या आयुष्यात अभिजीतची एन्ट्री!

गेल्या वर्षी दिव्याची भेट दिल्लीतील व्यापारी आणि सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजीतशी झाली. ती अभिजीतच्या प्रेमात पडली. दोघांमध्ये शारिरीकसंबंधही होते. त्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू झाली. असं म्हटलं जात आहे की, दिव्या अभिजीतला ब्लॅकमेल करत होती त्यामुळे त्याने तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी आता पोलिसांनी अभिजीत आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. दिव्याची हत्या संदीपच्या खुनाचा बदला असावा, असंही म्हटलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT