Mumbai Crime News : वासनांध प्रवाशनं थेट टॅक्सीमध्येच महिलेसमोर सुरू केलं... ग्रँट रोड परिसरातील चीड आणणारी घटना
एका वासनांध व्यक्तिने निर्लज्जपणा केल्याचा एका कीळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे आता महिला टॅक्सीमध्ये, लोकलमध्ये, बसमध्ये आणि एकूणच कुठेही प्रवास करताना सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईमध्ये पुन्हा एक विचित्र घटना समोर
महिलेसमोर टॅक्सीमध्ये वासनांधाने...
मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील घटना
Mumbai Crime News : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या घटना पाहता महिले सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच आता आणखी एका वासनांध व्यक्तिने निर्लज्जपणा केल्याचा एका कीळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे आता महिला टॅक्सीमध्ये, लोकलमध्ये, बसमध्ये आणि एकूणच कुठेही प्रवास करताना सुरक्षित आहेत का? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांना पडू शकतो. टॅक्सीतून प्रवास करत असताना महिला सहप्रवाशासमोर हस्तमैथुन करण्याचा एक विचित्र प्रकार काल 12 डिसेंबररोजी समोर आला आहे. संबंधीत पुरुषाविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> आई-बहिणीवरून शिवी दिल्यास 500 रु. दंड, 'या' गावाचा नवा नियम!
मुंबईतील ग्रँट रोड परिसरात गेल्या 30 नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेतील पीडितेच्या मित्राने हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 78 आणि 79 नुसार आरोपीविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 डिसेंबर रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थीनी असलेली पीडिता, ग्रँड रोड रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी शेअर टॅक्सीत बसली. पण याच प्रवासादरम्यान एका अज्ञात सहप्रवाशाने थेट भर रस्त्यात टॅक्सीमध्येच तिच्यासमोर हस्तमैथुन सुरू केलं. हा संपूर्ण प्रकार टॅक्सीमध्ये असलेल्या पीडितेच्या मित्राने पाहिल्यानंतर त्यानं ते रेकॉर्ड केलं. त्यानंतर आता हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Nitesh Rane : "ज्यांना 2 पेक्षा जास्त मुलं..."; लाडकी बहीण योजनेबाबत नितेश राणे 'हे' काय बोलून गेले
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. गावदेवी पोलिसांनी तपास सुरू केला असून, व्हिडीओच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT