Udaipur Killing: हिंदू टेलरची हत्या करणारे पाकिस्तानातील अतिरेकी संघटनेशी जोडलेले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजस्थानच्या उदयपूरमध्ये मंगळवारी दोघांनी कन्हैया लाल नावाच्या टेलरची हत्या केली. या क्रुर हत्येमुळे राजस्थानमधिल जातीय तणाव वाढला आहे. शांतता राखण्यासाठी एक महिन्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मद असे दोन गुन्हेगार, इस्लामच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आले होते. पिडीत टेलरने भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. प्रेषित मुहम्मह पैगंबर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिपण्णी केल्यामुळे शर्मांना पक्षातून निलंबीत केले होते.

ADVERTISEMENT

गुन्ह्याची कबुली देणारे व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचा पाकिस्तानमधील दावत-ए-इस्लामी या धार्मिक चळवळीशी संबंध असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे. दावत-ए-इस्लामी ही सुन्नी मुस्लीम संघटना आहे. ही संघटना प्रेषित पैगंबरांच्या विचारांचा प्रचार करते तसेच इस्लामचा आनलाईन धडे देते. त्याचबरोबर एक टीव्ही चॅनेल देखील चालवते.

दावत-ए-इस्लामीची स्थापना मौलाना इलियास अत्तारी याने 1981 मध्ये कराची येथे केली होती. तेव्हापासून, ती जगभरातील सुमारे 194 देशांमध्ये पसरली आहे. संघटनेच्या संस्थापकाच्या नावामुळे, संस्थेशी संबंधित असलेले लोक त्यांच्या नावांच्या समोर “अटारी” असे जोडतात.

हे वाचलं का?

दावत-ए-इस्लामी भारतात कशी आली?

1989 मध्ये पाकिस्तानातील उलेमांचे शिष्टमंडळ भारतात आले होते. चर्चेनंतर दावत-ए-इस्लामीची स्थापनाही येथे झाली, ज्याचे मुख्यालय दिल्ली आणि मुंबई येथे आहे. सय्यद आरिफ अली अत्तारी हा भारतात संस्थेचा आणखी विस्तार करण्यासाठी कार्यरत आहेत.

ADVERTISEMENT

दावत-ए-इस्लामी आपल्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मदनी नावाचे टीव्ही चॅनल चालवते. उर्दूसोबतच इंग्रजी आणि बंगाली भाषेतही कार्यक्रम प्रसारित केले जातात. संस्थेचे सदस्य सहसा हिरवी पगडी घालतात; काही सदस्य पांढरी पगडी देखील घालतात.

ADVERTISEMENT

दावत-ए-इस्लामीचे दोन सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे मदनी काफिला आणि नेक अमल. तबलीगी जमातीप्रमाणे, दावत-ए-इस्लामीचे सदस्य इस्लाम आणि पैगंबंराचा संदेश प्रसारित करण्यासाठी जगभर प्रवास करत असतात. बारवफत निमित्त (प्रेषितांच्या जयंती) मुस्लीमबहुल भागात संघटना मिरवणुका काढते.

संघटनेवर धर्मांतराचे आरोप

भारतातील तीन दशकांच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये दावत-ए-इस्लामीवर अनेक प्रसंगी धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. शरीयतचा प्रचार करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याने, संघटना 32 इस्लामिक अभ्यासक्रम ऑफर करते जे ऑनलाइन घेतले जाऊ शकतात.

दावत-ए-इस्लामी ऑनलाइन कोर्सद्वारे धर्मांतर आणि कट्टरपंथी बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण देखील देते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना संघटनेने कट्टर इस्लामवादासाठी प्रवृत्त केले होते का, याचा तपास तपासकर्ते करत आहेत.

हत्येनंतर दोन्ही आरोपी अजमेर शरीफकडे निघाले होते, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. राजस्थान पोलिसांची एसआयटी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा आता ते अतिरेक्यांच्या नेटवर्कचा भाग होते का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT