सासूला सरप्राईज देणं पडलं महागात, सून थेट गेली तुरुंगात…

मुंबई तक

दिल्लीतील सासू-सुनेच्या एका प्रकारामुळे पोलिसांनाच नाही तर ती बातमी वाचणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला आहे. कारण सुनेला सासूला एक सरप्राईज द्यायचं होतं मात्र ते सरप्राईज देता देता पोलिसांनी तिला आता बेड्याच ठोकल्या आहेत, आणि तिला तुरुंगातच पाठवलं आहे.

ADVERTISEMENT

Police arrested daughter-in-law who stole 3 lakhs and gold ornaments from mother-in-law in New Delhi
Police arrested daughter-in-law who stole 3 lakhs and gold ornaments from mother-in-law in New Delhi
social share
google news

New Delhi Crime: नवी दिल्लीतील एका सुनेने आपल्या सासूला सरप्राईज (Surprise) देण्याचा विचार केला होता. ते सरप्राईज देण्यासाठी तिने असा काही प्लॅन केला होता की, ती स्वतःच तुरुंगात गेली आहे. त्यामुळे या घटनेची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ही घटना घडली आहे.  दिल्लीतील अशोकनगर (Delhi Ashoknagar) भागातील आहे. पोलिसांनी सुनेला चोरीच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

पैसेही गेले अन् दागिनेही…

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, न्यू अशोकनगर पोलीस स्थानकामध्ये एक तक्रार दाखल झाली होती. त्यामध्ये 3 लाख रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना तिथे ज्येष्ठ महिला रजिया बेगम यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्या आपल्या सुनेबरोबर नोएडातील सेक्टर-18मध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. मात्र त्या ज्यावेळी घरी परतल्या त्यावेळी घरातून 3 लाख रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेले होते.

हे ही वाचा >> ’10 वर्षापूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा पण आता…’, मोदींनी मुंबईत येताच केला प्रहार

सीसीटीव्हीनं बिंग फोडलं

रजिया बेगम यांनी घरात चोरी झाल्याची तक्रार पोलिसात केली त्यानंतर पोलिसांनीही क्राईम पथकाला आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना बोलवण्यात आले. त्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला. ज्यावेळी पोलिसांनी त्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासल्या त्यावेळी त्यामध्ये एक बुरखाधारी महिला घराच्या दिशेने येताना दिसली. त्यानंतर त्याच परिसरातील दुसऱ्या सीसीटीव्हीची तपासणी केली तेव्हा मात्र पहिल्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी तिच महिला सेक्टर 18 कडे जाताना दिसली.

ही माझीच सून

चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक सीसीटीव्हीची तपासणी करायला सुरुवात केली. त्यावेळी एका फुटेजमध्ये महिलेचा चेहरा स्पष्ट दिसून आला. त्यानंतर तक्रारदार रजिया बेगम यांना तुम्ही यांना ओळखता का विचारले असता त्यांनी ही माझी सूनच असल्याचे पोलिसांना सांगितले. तिच्याबरोबरच त्या हॉटेलमध्ये गेल्या होत्या.

चोरीसाठी लढवली शक्कल

पोलिसांनी चोरी करणाऱ्या सुनेला पकडल्यानंतर मात्र तिला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर तिने सांगितले की, तिला आपल्या सासूला सरप्राईज द्यायचे होते. त्यासाठी तिने आधी सासूला सेक्टर 18 मधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. त्यानंतर तिने ऑर्डर देऊन सासूला हॉटेलमध्येच बसवले. त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली. मैत्रिणीच्या घरी जाऊन तिने बुरका घातला आणि तिने आपल्या घरात प्रवेश करून पैसे आणि दागिन्यांची चोरी केली. ते चोरीचं सगळं साहित्य तिने आपल्या ओळखीच्या घरी ठेवले आणि पुन्हा ती आपल्या सासूकडे निघून गेली.

खरं की खोटं

पोलिसांनी ज्या सुनेला ताब्यात घेतले आहे, तिने सांगितले की, ती रक्कम आणि दागिने सासूला ती परत करणार होती. मात्र पोलिसांना बघून ती घाबरली होती. मात्र पोलिसांनी आता तिला ताब्यात घेऊन अटक केली आहे. ही गोष्ट ती पोलिसांना आणि सासूला फसवण्यासाठी सांगत आहे की, ती खोटं बोलत आहे त्याची चौकशी आता पोलीस करत आहेत.

हे ही वाचा >> ‘संजय राऊत म्हणजे थुकलेले पान’, भाजप आमदार नितेश राणेंकडून जहरी टीका

हे वाचलं का?

    follow whatsapp