Sana khan :’…नदीत फेकला मृतदेह’, भाजप पदाधिकारी हत्या प्रकरणाची Inside Story
महाराष्ट्रातील भाजप (BJP) महिला नेता सना खान (Sana Khan) या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सना खान ज्या व्यक्तीला नागपूरहून जबलपूरला भेटायला गेल्या होत्या, त्या व्यक्तीनेच त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील भाजप (BJP) महिला नेता सना खान (Sana Khan) या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात त्यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सना खान ज्या व्यक्तीला नागपूरहून जबलपूरला भेटायला गेल्या होत्या, त्या व्यक्तीनेच त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी पप्पू उर्फ अमित शाहू याला जबलपूर येथून अटक केली आहे. आरोपी पप्पू शाहू याने खुनाची कबुली दिली आहे. या हत्येच्या गुन्ह्यात आणखीए एका आरोपीचा सहभाग होता, या आरोपीचाही शोध घेतला जात आहे. (sana khan killed papu sahu business partner bjp woman leader nagpur crime story)
ADVERTISEMENT
भाजप नेत्या सना खान ही 1 ऑगस्ट रोजी नागपुरातील तिचा व्यावसायिक भागीदार अमित उर्फ पप्पू शाहूला भेटण्यासाठी नागपूरहून जबलपूरला गेली होती. सनाने तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते की, ती दोन दिवसात परत येईल. पण आठवडा झाला तरी सना परतली नाही किंवा तिच्याबाबत काहीही माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली नव्हती. तसेच सनाचा फोन बंद असल्याने तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली होती. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा : ISIS प्रकरणात NIAची मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून एकाला अटक
सना खान बेपत्ता झाल्याने नागपुरात (Nagpur) एकच खळबळ माजली होती. मात्र, आता याच सना खान यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्यांचा बिझनेस पार्टनर अमित शाहू याला अटक करण्यात आली आहे. शाहूने सना खानची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे.
हे वाचलं का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना आणि अमित हे पती-पत्नी होते. त्यांच्यात अनेक दिवसांपासून पैशांवरून वाद सुरू होता. यामुळे सना त्याला भेटण्यासाठी जबलपूरला पोहोचली होती. यावेळी घरात दोघांमध्ये टोकाची भांडणे झाली. या भांडणातून आरोपी अमितने सनावर लोखंडी रॉडने हल्ला करून तिची हत्या केली, या हत्येनंतर जबलपूरपासून 45 किमी अंतरावर असलेल्या हिरण नदीच्या पुलावरून मृतदेह फेकून देण्यात आला, असे आरोपीने सांगितले आहे. आरोपीने हिरण नदीत मृतदेह फेकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवली होती. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती मृतदेह लागला नाही आहे.
या प्रकरणात आरोपी अमित साहूसोबत त्याचा आणखीण एक साथिदार असल्याची माहिती आहे. हा साथिदार सध्या फरार आहे. पोलीस या साथिदाराचा शोध घेत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Nitin Gadkari: ‘पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस आणणार’, गडकरींनी दादांना सांगितलं; बघून घ्या!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT