Air India Pilot Suicide : 25 वर्षीय पायलट तरूणीने स्वत:ला संपवलं, नॉन व्हेज खाल्ल्यानं प्रियकराकडून...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Air India Pilot suicide in Mumbai: मुंबईतील अंधेरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही तरुणी एअर इंडियामध्ये पायलट होती. तिच्या कुटुंबीयांना ती भाड्यानं राहत असलेल्या अंधेरीतील घरी तीचा मृतदेह आढळल्यानंतर ही घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली असून, प्रियकरासोबत झालेल्या वादातून हा प्रकार समोर आला  आहे. 

ADVERTISEMENT

सोमवारी सकाळी मुंबईतील अंधेरीमधील एका अपार्टमेंटमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. तरूणीच्या 27 वर्षीय प्रियकराने तिचा मांसाहार करण्यावरुन एका कार्यमक्रमात अपमान केला होता. त्यातूनच तरूणीने असं टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सृष्टी तुली असं मृत तरुणीचं नाव असून, ती उत्तर प्रदेशातील गोरखपूरची रहिवासी आहे. तर तिच्या प्रियकराचं नाव आदित्य पंडित असं आहे. आदित्य हा तिच्यावर अत्याचार करत होता आणि मानसिक त्रास देत होता. आरोपी आदित्यने गुरुग्राममधील एका कार्यक्रमात मांसाहारी पदार्थ खाल्ल्याबद्दल सर्वांसमोर तिचा अपमान केला, त्यानंतर त्यांचा वाद झाला आणि आदित्य तिला तिथेच सोडून घरी गेला, असा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

हे ही वाचा >>Shrikant Shinde : "पण शिंदे साहेब अपवाद ठरले...", मोदी-शाहांचा उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची बापासाठी भावनिक पोस्ट

रविवारी संध्याकाळी सृष्टी कामावरून घरी परतली तेव्हा, तिचं आदित्यशी भांडण झालं होतं. त्यानंतर सोमवारी पहाटे एकच्या सुमारास आदित्य दिल्लीला रवाना झाला. त्यानंतर सृष्टीने त्याला कॉल केला आणि सांगितलं की, ती आत्महत्या करणार आहे. त्यानंतर आरोपी आदित्य लगेचच तिच्या घरी परतला. मात्र, जेव्हा तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला दरवाजा बंद असल्याचं दिसलं. त्यानंतर आदित्यने चावी बनवणाऱ्या व्यक्तिच्या मदतीनं कुलूप उघडलं असता, ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. आरोपीने तरूणीला तातडीनं रुग्णालयात नेलं, पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Amit Shah Vinod Tawde Meeting : भाजप हायकमांड देणार धक्का? दिल्लीत अमित शाह-तावडेंच्या भेटीनं चर्चा

 

मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी आदित्यविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून, तो आपल्या मुलीवर अत्याचार करायचा आणि त्यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं असा आरोप केला आहे. मृत तरूणीचे काका विवेक तुली यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितलं की, सृष्टी गोरखपूरची पहिली महिला पायलट होती.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही तिचा यानिमित्त गौरव केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT