जावई नाही आता तोच नवरा... सासूचा लग्नासाठी हट्ट, मुलगा आला समजवायला अनिता म्हणाली, 'येत नाही जा!'
आपल्या होणाऱ्या जावयासोबतच पळून गेलेली अनिता देवी परत आली, मात्र अजूनही तिचा विचार बदलला नाही. आपला जावई राहुलसोबतच लग्न करणार आणि त्याच्यासोबतच राहणार असल्याचं तिने सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सासू जावयाच्या लव्ह स्टोरीमधील नवीन अपडेट

जावयासोबतच लग्न करण्याचा सासू करण्याचा हट्ट

अनिताच्या वागण्यावर तिच्या नवऱ्याचे मत
Aligarh Crime: आपल्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेलेली अनिता देवी परत आली असली तरी तिचा विचार बदललेला नाहीये. ती अजूनही तिच्या जावयासोबत म्हणजेच राहुलसोबत राहण्यावर ठाम आहे. कारण पोलीस स्टेशनमध्ये अनिताचे पती आणि तिच्या दोन निष्पाप मुलांनी आईला घरी येण्याची विनंती केल्यानंतर त्या महिलेने स्पष्टपणे नकार दिला.
सध्या, अनिता पोलिसांच्या ताब्यात असून तिची काउंसलिंग केली जात आहे. अनिताचा नवरा, तिची मुले आणि शेजारील महिला तिला SHO ऑफिसमध्ये भेटायला गेल्यावर त्यांनी तिला घरी परत येण्याची विनंती केली. त्यावेळी, तिने स्पष्टपणे सांगितले, "आता मी माझ्या पतीकडे परत जाणार नाही, मला माझे आयुष्य फक्त राहुलसोबत घालवायचे आहे." मिळालेल्या माहितीनुसार, अनिता देवी आणि राहुल दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. महिलेला वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे, तर राहुल मडराक पोलीस स्टेशनमध्ये आहे.
DSP महेश कुमार म्हणाले की, "हे प्रकरण कौटुंबिक वादाशी संबंधित आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचे समुपदेशन म्हणजेच काउंसलिंग केली जात आहे." तसेच, जे काही आरोप झाले आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे. जे काही पुरावे समोर येतील त्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले.
हे ही वाचा: साखरपुड्यात नवरीने बॉयफ्रेंडला मारली मिठी! IT अधिकारी असणाऱ्या नवऱ्याने घेतला गळफास, नाशिकमध्ये काय घडलं
अनिताचा नवरा तिला सोबत ठेवण्यासाठी तयार
अनिता देवीचे पती जितेंद्र म्हणाले, "मला माझ्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नाही कारण माझी लहान मुलं आहेत. मला माझे घर पुन्हा सुधारायचे आहे. आईशिवाय मुलं खूप अस्वस्थ आहेत. मी एकटाच त्यांना सांभाळत आहे." जितेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी जाताना तिच्यासोबत 3.5 लाख रुपये रोख, 5.5 लाख रुपयांचे दागिने घेऊन गेली होती आणि या सर्व गोष्टी त्यांना पुन्हा हव्या आहेत.
जितेंद्र यांनी राहुल यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी राहुलने अशी वाईट कृत्ये केली आहेत. त्यांच्या मते, राहुल फोनवर महिलांना फसवतो, त्यांच्याशी गोड बोलतो. नंतर त्यांना स्वतःकडे बोलावतो आणि त्यांचे पैसे आणि दागिने हिसकावून घेतो. गरज संपल्यानंतर तो त्या महिलांना एकटं सोडून देतो. जितेंद्र म्हणाले, "मला वाटते की दोघांनीही चूक केली आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण तरीही मी माझ्या पत्नीला एक संधी देऊ इच्छितो. आधी माझ्या कुटुंबाशी याबाबतीत बोलणं होईल, मग निर्णय घेतला जाईल. मी अनिताला घटस्फोट देणार नाही कारण माझ्या मुलांना तिची गरज आहे."
हे ही वाचा: Maharashtra Weather : पुणे, सातारा, सोलापूरमध्ये उष्णतेच्या झळा! आज तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?
अनिता देवीची मुलगी शिवानीचे लग्न 16 एप्रिल रोजी राहुलसोबत ठरलं होतं. पण लग्नाच्या काही दिवस आधीच अनिता देवी तिच्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. दोघंही जवळपास एक आठवडा फरार होते आणि नंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वत:ला सरेंडर केलं.