वकील महिलेची पूर्ण पाठ काळी-निळी केली, रिंगण करून मारलं.. आरोपी गावातीलच हैवान!
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका महिलेला गावातील सरपंच आणि काही लोकांनी अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बीड: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील गावातील गुंडांनी एका वकील महिलेला अत्यंत शुल्लक कारणावरून अत्यंत अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या या महिलेला गावातील सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात मारहाण करण्यात आली आहे. रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेबाबत आता सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील आहे. पीडित महिला वकील, ज्ञानेश्वरी यांना गावातील मंदिरातील लाऊडस्पीकर आणि जवळील पीठाच्या गिरणीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. त्यांना मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्याचा त्रास असल्याने त्यांनी याबाबत गावातील सरपंच अनंत अंजाना यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी सरपंचाने कर्मचाऱ्याला सांगून आवाज कमी करू, असे आश्वासन दिले.
हे ही वाचा>> कराडच्या Encounter चा दावा, EVM मशीन आणि मुंडेंवर खळबळजनक आरोप करणारा पोलीस रणजीत कासलेची A to Z माहिती
मात्र, आवाज कमी न झाल्याने ज्ञानेश्वरी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन पुन्हा विनंती केली. कर्मचाऱ्याने नॉनव्हेज खाल्ल्याने मंदिरात जाऊ शकत नाही, असे सांगत आवाज लाऊडस्पीकरचा कमी करण्यास नकार दिला. यानंतर, ज्ञानेश्वरी यांनी पोलिसांना फोन करून तक्रार नोंदवली. ज्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून लाऊडस्पीकरचा आवाज बंद केला.
याच रागातून ज्ञानेश्वरी यांना अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर ज्ञानेश्वरी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे तिच्यावर तात्पुरते उपचार करून घरी सोडण्यात आलं.
हे ही वाचा>> सासू अनिता जावयासोबत का पळाली? खुद्द राहुलने केला खळबळजनक खुलासा; म्हणाला, "मी लग्नासाठी..."
सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या महिलेला मारहाण केल्याचं समोर आल्यानंतर बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. आता याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात कलम 118(2), 118(1), 115(2), 74, 189(2), 190, 191(2), 352, 351(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे पथक आरोपींचा शोध घेत आहेत.
याशिवाय ज्ञानेश्वरीच्या काही नातेवाईकांना देखील यावेळी मारहाण कऱण्यात आली. त्या विरोधात गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार पक्षाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. “एका वकील महिलेला 10 पुरुषांनी मारहाण करणे कितपत योग्य? सरपंचाचा हा कारभार कोणत्या पक्षाशी संबंधित आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.