'सासूच नाही तर आणखी दोन महिलांनाही...', तरुण सासूला पळवून नेणाऱ्या जावयाबाबत सासऱ्यांनी सांगितली 'ती' गोष्ट!
अलीगढमधील सासू आणि जावयाच्या प्रेमकथेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांचा तपास सुरू असतानाच राहुलच्या होणाऱ्या सासऱ्यांना एक राहुलबद्दल एक धक्कादायक बातमी कळाली. राहुलच्या ओळखीच्या लोकांनीच त्याच्या होणाऱ्या सासऱ्याला त्याच्याबद्दल सांगितलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सासू जावयाच्या प्रेमकथेतील नवीन अपडेट

राहुलच्या होणाऱ्या सासऱ्याने काय सांगितले?

अलीगढमधील प्रेम प्रकरणातील नवीन खुलासा
अलिगढ: आपल्या लग्नाआधीच होणाऱ्या सासूसोबत पळून जाणाऱ्या राहुल संबंधित आता धक्कादायक बातमी समोर आली आहेत. सर्वत्र चर्चेचा विषय ठरणाऱ्या या प्रेमकथेतील आरोपी तरुण म्हणजेच राहुल ज्या दिवशी घरातून पळून गेला तेव्हा याची कोणालाही कल्पनाच नव्हती. राहुल असं करु शकतो यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. मात्र, या घटनेची सगळीकडेच चर्चा सुरू असताना लोक राहुलच्या होणाऱ्या सासऱ्याला राहुलविषयी जुन्या चकित करणाऱ्या बाबी सांगताना दिसत आहेत.
जितेंद्र यांच्या मते, राहुल याआधी सुद्धा दोन बायकांना पळवून घेऊन गेला होता. मात्र, याबाबतीत कुठेच चौकशी करण्यात आली नसल्याने या बाबी समोर आल्या नव्हत्या. आता राहुलने तिसऱ्यांदा असंच केलं असून यावेळी तो तिच्या होणाऱ्या सासूलाच घेऊन पळून गेला आहे.
यापूर्वी सुद्धा राहुल असं केल्याची माहिती
अनीता देवीचे पती म्हणजेच जितेंद्र यांच्या मते, हळूहळू राहुलच्या वाईट बाबी समोर येत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर जितेंद्र यांनी अनेकजण फोन करुन राहुलने यापूर्वी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल सांगत आहेत. याविषयी बोलताना, राहुल याआधी सुद्धा दोन महिलांना पळवून घेऊन गेला असल्याचं जितेंद्र यांनी सांगितलं. मात्र, यासंबंधी कुठेच चौकशी किंवा पोलिसात तक्रार केली नसल्याने या गोष्टी समोर आल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या खऱ्या आणि वाईट कृत्यांबद्दल आम्हाला काहीच कळलं नाही. जितेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे यावेळी त्याच्या होणाऱ्या सासूवरच त्याने निशाणा साधला आणि तिला पळवून घेऊन गेला. आता, पोलीस या घटनेची चौकशी करत असतानाच बरेच खुलासे समोर येत आहेत.
हे ही वाचा: Pune: पत्नीच्या गुप्तांगावर हळद-कुंकू लावलं, लिंबू पिळलं अन्... पतीचं भयंकर कृत्य
दोघांचाही फोन बंद
8 एप्रिल रोजी संध्याकाळी राहुल त्याच्या होणाऱ्या सासूला घेऊन गायब झाला तसेच, यासोबतच त्याने घरातील दागिने आणि पैसे सुद्धा नेले. या सगळ्यामुळे दोघांच्याही कुटुंबियांना मोठा धक्का बसला. गायब झाल्यापासूनच दोघांचे फोन बंद आहेत आणि यामुळे त्यांच्या लोकेशनचा सुद्धा शोध घेता येत नाहीये. जितेंद्र यांनी पोलिसात दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे परंतु, आतापर्यंत पोलिसांना कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांच्या मते, दोघांचा शोध सुरू आहे, मात्र त्यांचे मोबाईल बंद असल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधणे कठीण आहे.
आनंद साजरा करण्याऐवजी दु:खद वातावरण
या संपूर्ण प्रकरणामुळे फक्त कुटुंबियांनाच नव्हे तर गावातील इतरांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे. नातेवाईक, शेजारी आणि गावातील लोकांमध्ये या प्रकरणासंबंधी वेगवेगळी चर्चा रंगत आहे. जितेंद्र म्हणाले, "माझी बायको आमच्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून जाईल, असा विचारसुद्धा केला नव्हता." तिने आम्हाला सर्वांनाच धोका दिला आणि तिच्या या वागण्यामुळे आमच्या कुटूंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली."
हे ही वाचा: सौरभ, साहिल की तिसराच कोणी? पतीचा मृतदेह ड्रममध्ये भरणारी मुस्कान गर्भवती; सासरच्यांनी काय सांगितलं?
लोकांनी सांगितलं राहुलबद्दल बरंच काही
या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच राहुलच्या आसपासच्या आणि ओळखीच्या लोकांनी जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांना फोन करुन राहुलच्या वाईट कृत्यांची माहिती दिली. राहुल आधी एका तरुणीला घेऊन पळून गेला होता आणि त्याच्या दोन महिन्यांनंतर तो परत आला. इतकेच नव्हे, तर तो दुसऱ्यांदा सुद्धा असंच वागला होता. मात्र, याबाबतीत त्याच्या घरच्यांनी कुठेही काही कळू दिलं नाही, असं अनेकांनी जितेंद्र यांना फोन करुन सांगितलं. यावर, जितेंद्र यांच्या कुटूंबियांनी सांगितले की, याआधी जर राहुलची तक्रार केली असती तर तो तिसऱ्यांदा असं वागलाच नसता.
पोलीसांना ठोस माहिती मिळण्यात अपयश
पोलीस या घटनेचा तपास करतच आहेत, मात्र अद्याप कोणताच ठोस पुरावा त्यांच्या हाती लागलेला नाही. राहुल आणि अनिता देवी या दोघांचा फोन असल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागत नाहीये. पोलिस आता राहुलच्या जुन्या रेकॉडचीसुद्धा चौकशी करत आहेत, जेणेकरून त्याच्या विरुद्ध पूर्वीच्या घटनांची माहितीही समोर येईल.