Exclusive: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, प्रचंड हादरवणारा रिपोर्ट मुंबई Tak च्या हाती

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

प्रचंड हादरवणारा रिपोर्ट मुंबई Tak च्या हाती
प्रचंड हादरवणारा रिपोर्ट मुंबई Tak च्या हाती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात सरकारची दोन सदस्यीय समिती

point

समितीचा अत्यंत धक्कादायक रिपोर्ट आला समोर

point

चिमुकल्या मुलींवर 15 दिवसात अनेकदा लैंगिक अत्याचार, रिपोर्टमध्ये हादरवून टाकणारी माहिती

Badlapur Case Exclusive Report: बदलापूर: बदलापूर प्रकरणात आता एक असा अहवाल समोर आलाय. जे पाहून तुमच्याच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या एक्स्क्लुझिव्ह रिपोर्टबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्रकरणात रोज डोक्यात तिडीक जाणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. (badlapur case exclusive in 15 days both girls were sexually assaulted many times a very shocking report)

ADVERTISEMENT

12 ते 15 ऑगस्टदरम्यान या दोन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. यातील एका मुलीने शारीरिक त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच त्रास मैत्रिणीसोबतही होतोय असंही या मुलीने सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केला. तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यास तयार नसल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं.  

यानंतर आंदोलनं झाली, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सरकारनं एसआयटीची स्थापन केली. शिवाय सरकारनं एक दोन सदस्यीय समितीही गठीत केली होती. याच समितीनं एक रिपोर्ट तयार केला आहे. जो मुंबई Tak च्या हाती लागला आहे.

हे वाचलं का?

'तो' धक्कादायक अहवाल आला समोर...

बदलापूर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्याने नियुक्त केलेल्या दोन सदस्यीय समितीने राज्य सरकारला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला आहे.

प्राथमिक अहवालातील धक्कादायक निरीक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना ही समोर आली असून आता त्याबाबत सखोल तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Badlapur: 'अक्षय शिंदेचं 4 महिन्यापूर्वीच दुसरं लग्न झालेलं, पहिली बायको...', समोर आली नवी माहिती

1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी सेक्युरीटी म्हणून जॉईन झाला होता. यावेळी अक्षय शिंदे याची कोणतीही पार्श्वभूमी तपासल्याशिवाय त्याला भरती करण्यात आलं होतं. त्याला शाळेच्या आवारात महिला स्वच्छतागृहांसह कोणत्याही ओळखपत्राशिवाय थेट प्रवेश होता.  त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली होती 

शाळा प्रशासनाच्या या प्रकरणात मोठ्या त्रुटी आढळून आल्या आहेत. 

हे प्रकरण हाताळण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून शाळा प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. येत्या सात दिवसांत उत्तरे मागविण्यात आली आहेत.

या प्रकरणी शाळा प्रशासनावर POCSO कायदा का लावला जाऊ नये?, असे प्रश्न समितीने उपस्थित केले आहेत. तक्रारीनंतरही शाळा प्रशासन हे तब्बल 48 तास कोणतीही कारवाई करताना दिसून आलं नाही.

हे ही वाचा>> Maharashtra Bandh: उद्धव ठाकरे उद्या स्वत: चौकात जाऊन बसणार, ठाकरेंची एक घोषणा अन्...

शाळेच्या मुख्याध्यापकांनी 14 ऑगस्ट 2024 रोजी विश्वस्तांना घटनेची माहिती दिली. मात्र, तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही. अल्पवयीन मुलींना उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले.

स्वच्छतागृह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर आहे. सुरक्षिततेसाठी योग्य सीसीटीव्ही तेथे बसवलेले नाहीत.

बदलापूरच्या अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यानं पालकांना विचारले की, मुली दोन तास सायकल चालवतात? यावरून असे दिसून येते की अशा संवेदनशील प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी कोणतीही संवेदनशीलता आणि ज्ञान नाही, असं सुद्धा या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे...

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT