Crime News : मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीलाच चिरडलं! पुण्यात आणखी एक ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील पौड फाट्याजवळ रविवारी (8 सप्टेंबर 2024) रात्री एक भीषण अपघात झाला.

point

या अपघातात मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले

point

पत्नी गीतांजली अमराळे यांचा जागीच मृत्यू झाला

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील पौड फाट्याजवळ रविवारी (8 सप्टेंबर 2024) रात्री एक भीषण अपघात झाला. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.  रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने पीक अप गाडीने 4-5 वाहनांना जबरदस्त धडक दिली. (pune drunk and drive case accident driver of pickup truck hit car of mns leader shrikant amrale his wife died

या भीषण अपघातात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर, त्यांची पत्नी गीतांजली अमराळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीकांत अमराळे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी आशिष पवारला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. 

हेही वाचा : Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता फक्त...

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ड्रंक अँड ड्राइव्हच्या आणखी एका घटनेने पुणे हादरलं आहे. एका पीक अप गाडीच्या चालकाने मद्यधुंद अवस्थेत चार ते पाच वाहनांना धडक दिली. ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Govt Job: अरे व्वा! चक्क BIS मध्ये होतेय भरती, कोणाला करता येणार अर्ज?

रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला. कोथरूड येथील पौडफाटा परिसरातील करिष्मा चौकात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू होता. रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती. स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर खचाखच गर्दी होती, अशावेशळी पीक अप टेम्पोने स्थानिक मनसे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली आणि त्यांच्या अंगावरून गाडी नेली यामध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर श्रीकांत अमराळे गंभीर जखमी आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT