Crime : रात्री हातावर मेहंदी काढली, सकाळी आईचा मृतदेह पाहून मुलीने...संभाजीनगर हादरलं!
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत रात्री आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सकाळी उठून आईचा (Mother) मृतदेह पाहताच मुलीला (Daughter) देखील राहावलं नाही आणि तिने देखील विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आईचा मृतदेह पाहून मुलीने संपवलं आयुष्य
मायलेकीच्या मृत्यूने संभाजीनगर हादरलं
अंतिम यात्रेसाठी आलेल्या मुलगा सुनेला झाला अपघात
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : इसरार चिश्ती, औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत रात्री आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. सकाळी उठून आईचा (Mother) मृतदेह पाहताच मुलीला (Daughter) देखील राहावलं नाही आणि तिने देखील विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. वंदना दुधारे (35) आणि पल्लवी दुधारे (18) असे या मृत मायलेकींची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच मृत आईला आणि बहिणीला भेटायला येणाऱ्या मुलाला देखील अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने दुधारे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (chhatrapati sambhaji nagar crime mother and daughter commit suicide and brother accident shocking crime story)
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील गल्ले बोरगावमध्ये ही घटना घडली आहे. खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक संतोष भालेरावने आजतक दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून दुधारे परिवार शेतात राहत होता. घटनेच्या आदल्या रात्री उशिरा सर्व काम आटोपल्यानंतर मुलगी पल्लवीने आईच्या हाताला मेहंदी लावत होती. या दरम्यान आई आणि पल्लवीमध्ये कोणत्यातरी मुद्यावर मतभेद झाले होते. मात्र या मतभेदानंतर घरात सर्वजण झोपी गेले होते.
हे ही वाचा : Ladki Bahin yojana: अर्ज मंजूर झालाय, पण Village, Ward लेव्हल पेंडिंग; 3000 मिळणार की नाही?
सकाळ झाली तेव्हा पल्लवीला तिची आई घरी दिसली नाहीच. म्हणून तिने आजूबाजूच्या शेतात शोध घेतला असता विहिरीजवळ आईची चप्पल सापडली. त्यानंतर विहिरीत डोकावून पाहिलं असता तिला तिच्या आईचा मृतदेह विहिरीत दिसला. आईचा मृतेदह पाहून कोणताही विचार न करता पल्लवीने आईला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली, त्यामुळे तिचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने गावात शोककळा परसली होती.
हे वाचलं का?
या घटनेनंतर गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आई वंदना भरत दुधारे (वय 35) व मुलगी पल्लवी भरत दुधारे (18) या दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या आत्महत्येमागील कारणाचा तपास खुलदाबाद पोलिसांनी सूरू केला आहे.
दरम्यान आई आणि बहिणीच्या मृत्यूची बातमी समजताच भाऊ पत्नीसह घरी अंतिम संस्कारासाठी आला होता. मात्र वाटेत मुलगा आणि सुनेचा अपघात झाला होता. या अपघातात मुलगा आणि सून गंभीर जखमी झाल्या आहेत. त्याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Gulabrao Patil : ''अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही'', शिंदेंच्या मंत्र्याचा अजितदादांच्या खात्यावर निशाणा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT