हॉटेल मालकाला बाहेर काढलं, लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारलं! बारामतीतल्या 'त्या' व्हिडीओवर दादाही संतापले
Baramati Crime News : शुक्रवारीही सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मेडिकल कॉलेजजवळील एका हॉटेलमध्ये तीन मुले दुचाकीवरून आली. काउंटरवर बसलेल्या मालकाशी बोलत बोलत त्यांचा वाद झाला होता.
ADVERTISEMENT

Ajit Pawar on Baramati Crime : बारामतीमध्ये असणाऱ्या मेडिकल कॉलेजजवळील एका हॉटेल मालकाला तीन गुंडांनी बेदम मारहाण केली. ही घटना हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे मारहाण करणाऱ्या तीन गुंडांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांची मालिका सुरू आहे. बीडमध्ये मागच्या काळात घडलेल्या काही घटनांसारखीच ही घटना असल्यानं बारामतीमधील कायदा सुव्यवस्थेवरूनही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा >> "तलवारी पाहिजे, त्याला खल्लास करायचं...", अल्पवयीन आरोपीची कॉल रेकॉर्डींग समोर, बीड पुन्हा हादरलं
शुक्रवारीही सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मेडिकल कॉलेजजवळील एका हॉटेलमध्ये तीन मुले दुचाकीवरून आली. काउंटरवर बसलेल्या मालकाशी बोलत बोलत त्यांचा वाद झाला. त्यानंतर त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. 5 ते 6 मिनिटं तिघांनीही या व्यक्तीला लाथा-बुक्क्यांनी, कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि त्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तिन्ही गुंडांना ताब्यात घेतलं. हे तिन्ही आरोपी इंदापूर तालुक्यातील सेन्सर गावचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय. हॉटेल मालकाला मारहाण का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
अजित पवारांनी गुन्हेगारांना दम भरला...
अजित पवार यांनी या घटनेवर बोलताना सांगितलं. चौघजण आले, त्यांनी मार-मार मारलं. पट्ट्यानं मारलं, लाथाने मारत होते, फूटबॉल खेळत होते असं मारलं. मी पोलिसांना सांगितलं, माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचा कुणीही असला तरी मी त्यांना सोडणार नाही. सतत गुन्हे केले तर मकोका लावेल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी का झाडली? रात्री 11 वाजता शासकीय निवासस्थानी काय घडलं?
दरम्यान, बारामतीत गेल्या काही दिवसांमध्ये अशा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातही झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण करण्यात आली होती.