"तलवारी पाहिजे, त्याला खल्लास करायचं...", अल्पवयीन आरोपीची कॉल रेकॉर्डींग समोर, बीड पुन्हा हादरलं

मुंबई तक

Beed Crime News : राजकुमार साहेबराव करडे या अंबाजोगाईमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय युवकावर कोयता हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्याच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर सपासप वार करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या तरूणाच्या हत्येचं प्रकरण

point

आरोपीची कॉल रेकॉर्डींग समोर

point

आरोपीने तलवारी मागितल्याची कॉल रेकॉर्डींग

Beed Rajkumar Karde Case : बीड जिल्ह्यात गेल्या 2 एप्रिलला एक धक्कादायक घटना घडली होती. प्रेम प्रकरणातून दिवसाढवळ्या एका तरूणावर कोयत्याने वार करण्यात आले होते.  उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणातील एक कॉल रेकॉर्डींग समोर आली आहे. या रेकॉर्डींमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये खळबळ माजली आहे. बीडमध्ये पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल या रेकॉर्डींगनंतर निर्माण होतोय. 

हे ही वाचा >> लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी का झाडली? रात्री 11 वाजता शासकीय निवासस्थानी काय घडलं?

शॉर्ट फ्लिम बनवण्याचं काम करणाऱ्या तरूणावर सपासप वार केल्याची घटना 2 एप्रिल (मंगळवारी) सकाळी घडली होती. त्यानंतर या तरूणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, गंभीर जखमा असल्यानं युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईच्या फिर्यादीवरून चौघांजणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची एक कॉल रेकॉर्डींग सध्या समोर आली आहे. कॉलवर बोलणारा आरोपी हा मुलीचा चुलत भाऊ असून, तो या प्रकरणात सध्या पोलीस कोठडीत आहे. घटना घडण्यापूर्वीच्या या कॉल रेकॉर्डींमध्ये तो काय म्हणाला? पाहू...

आरोपी कॉलवर काय बोलला? वाचा शब्द अन् शब्द...

आरोपी : तुला फोन केला होता मला तलवारी पाहिजे म्हणून ...

मित्र- काय म्हणतो...कुणाचा मर्डर करायचा का?

आरोपी - त्याचाच करायचाय...

मित्र-नाही रे वेड्या...

आरोपी - ऐकणं भाऊ त्याला एकदा असलं हाणलं होतं, आम्ही पण आणि पोलिसांनी.... त्याला औषध पाजलं होतं...

मित्र - मी काय म्हणतो ऐक मॅटर सॉल झालं असेल ना आता?

हे ही वाचा >> ढसाढसा रडल्या, कागद-सह्या दाखवल्या, करूणा शर्मांनी धनंजय मुंडेंच्या कोणत्या 3 निकटवर्तीयांची नावं घेतली?

आरोपी - नाही

मित्र- मॅटर काय आहे, आता नेमकं मला काही समजत नाही...

आरोपी - त्याला खल्लास करायचंय...

मित्र - पंग झालास काय?

आरोपी - नाही...त्याला खल्लास करायचं

मित्र - अरे ऐक ना...(रेकॉर्डींग बंद)

काय होती संपूर्ण घटना? 

राजकुमार साहेबराव करडे या अंबाजोगाईमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय युवकावर कोयता हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्याच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर सपासप वार करण्यात आले होते. मुलाच्या आईने पोलीस फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मुलगा राजकुमार करडे हा शॉर्ट फिल्म तयार करत होता. मागच्या दोन वर्षांपासुन मुलगा राजकुमार साहेबराव करडे हा चनई येथील एका मुलीसोबत फिल्म तयार करत होता. काम करता करता दोघांची मैत्री झाली प्रेम वाढत गेलं. दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र, त्याच्या प्रेमाला मुलीचे वडील वैजनाथ शिंदे यांचा विरोध होता. 

जातीमुळे त्यांचा लग्नाला विरोध

आईने सांगितलं की, मुलगा राजकुमार नेहमी मला म्हणायचा, माझे त्या मुलीवर प्रेम असुन आम्ही लग्न करणार आहोत. पण आपली जात त्यांना समजल्यानं तिचे वडील आमचे लग्नाला विरोध करत आहेत. ते नेहमी मला तीचा नाद सोड, नाहीतर तुला मारून टाकू अशा धमक्या देत असल्याचं मुलगा मला सांगायचा.

हे वाचलं का?

    follow whatsapp