Crime : गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला, गळा अन् पोटावर सपासप वार...; थरकाप उडवणारा व्हिडिओ
Bengaluru Crime : पीडित तरूणी मदतीसाठी याचना करते. मात्र तिच्या मदतीला कुणीच पोहोचत नाही. काही मिनिटापर्यंत आरोपी तिच्यावर वार करतच राहतो आणि नंतर रक्ताच्या थारोळ्यात सोडून तिला निघून जातो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पेईंग गेस्ट राहणाऱ्या तरूणीची निर्घृण हत्या
गळ्यावर आणि पोटावर सपासप वार करत हत्या
घटनेचा सीसीटीव्ही आला समोर
Bengaluru Crime : बंगळुरूतील हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेत पेईंग गेस्ट राहणाऱ्या एका तरूणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये आरोपी तरूणीच्या गळ्यावर आणि पोटावर सपासप वार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे.या घटनेने आता हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
बंगळुरूतील या हत्याकांडाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एक तरूण प्लॅस्टीकची पिशवी घेऊन मृत तरूणीच्या घरी जात आहे. या व्हिडिओत तरूणीचं घर दिसत नाही. मात्र तरूण दरवाजावर पोहोचताच तरूणी दरवाजा उघडते. या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक चकमक होते.
हे ही वाचा : NCP : अजित पवारांना परभणीत झटका! बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
ही संपूर्ण घटना दरवाजाजवळ घडत असल्याने सीसीटीव्हीत काहीच दिसत नाही. मात्र काही सेकंदानंतर तरूण तिचे केस ओढत तिला फरफटत बाहेर आणतो. यावेळी आरोपीच्या हातात चाकूही दिसतोय. या चाकूने आरोपी तरूणीवर वार करण्याचा प्रयत्न करतो. या दरम्यान दोघांमध्ये झटापट होते. या झटापटीनंतर आरोपी तरूणीच्या गळ्यावर आणि पोटात सपासप वार करून हत्या करण्याचा प्रयत्न करतो.
हे वाचलं का?
पीडित तरूणी मदतीसाठी याचना करते. मात्र तिच्या मदतीला कुणीच पोहोचत नाही. काही मिनिटापर्यंत आरोपी तिच्यावर वार करतच राहतो आणि नंतर रक्ताच्या थारोळ्यात सोडून तिला निघून जातो. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणीचे नाव कृती कुमारी आहे. ती मुळची बिहारची असून ती शहरातील एका खासगी कंपनीत काम करत होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपी मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. अभिषेक असे आरोपीचे नाव आहे. त्याने अलीकडेच बंगळुरूमधील एका खासगी कंपनीतील नोकरी सोडली होती. तो कृती कुमारीच्या रूममेटचा प्रियकर होता. अभिषेक आणि कृतीच्या मैत्रिणीचं नात् फारसं चांगलं चालतं नव्हतं.
ADVERTISEMENT
अभिषेकची प्रेयसी कृती कुमारीच्या सांगण्यावरून पीजीमध्ये राहायला गेली अशी माहिती आहे. त्यामुळे कृती कुमारीमुळेच आपलं नात तुटल्याच्या संशय अभिषेकला होता. त्यामुळे याच कारणामुळे अभिषेकने कृतीची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sambhaji Nagar Honour Killing : बापानेच पुसलं लेकीचं कुंकू! रस्त्यातच जावयाची हत्या
या प्रकरणी आता बंगळुरु पोलिसांनी मुख्य संशयिताला अटक केली आहे. आरोपी अभिषेकला पोलिसांनी भोपाळमधून अटक केली आहे. कृती कुमारीची हत्या करून आरोपी भोपाळला पळून गेला होता. पोलिसांनी त्याला अटक करून आता चौकशी सूरू केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT