Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी हत्येबाबत प्रचंड मोठा खुलासा, नवी माहिती आली समोर...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी हत्येबाबत प्रचंड मोठा खुलासा

point

गोळ्या झाडणाऱ्या शूटर्सकडून दोन पिस्तुले जप्त

point

बाबा सिद्दीकींवर कार्यालयाबाहेर झाला होता गोळीबार

Baba Siddique Murder Update : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या शूटर्सकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. यातील एक देशी बनावटीचे पिस्तूल आहे तर, दुसरे युरोपियन बनावटीचे GLOCK पिस्तूल असल्याची मोठी माहिती पोलिसांनी दिली आहे. (baba siddique shot dead murder case new update mumbai police recovered two types of pistols from accused)

लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. बाबा सिद्दीकींचे एकूण तीन मारेकरी आहेत. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अजूनही फरार आहे. या तिघांचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी गुरमेल सिंग हा मूळचा हरियाणाचा आहे तर, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे उत्तरप्रदेशचे आहेत. या तिघांनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार केला होता. 

हेही वाचा : राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं ठरली! चित्रा वाघ यांच्यासह 'हे' 7 जण होणार आमदार!

याप्रकरणी पोलिसांनी गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना अटक केली आहे. या दोन शूटर्सकडून ही दोन्ही पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. त्याचवेळी या सर्वाचा मुख्यसूत्रधार मानला जाणारा मोहम्मद जीशान अख्तर, फेसबुक पोस्टमधून हत्येची जबाबदारी घेणारा शुभम लोणकर आणि हत्या करणारा आरोपी शिवकुमार फरार आहेत. तर, पोलिसांनी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकींवर कार्यालयाबाहेर झाला होता गोळीबार

विजयादशमीनिमित्त वांद्रे येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर लोक फटाके फोडत होते. बाबा सिद्दीकी रात्री 9.15 ते 9.20 च्या दरम्यान मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयातून बाहेर पडले. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तोंडाला रुमाल बांधलेले तीन जण अचानक कारमधून खाली उतरले आणि त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड फायर केले. यातील तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागल्या. यानंतर तत्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा : Gold Rate: सोन्याच्या दरवाढीला ब्रेक? आज 1 तोळ्याच्या किंमतीत किती रूपयांनी झाली घसरण?

बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांमध्ये धर्मराज कश्यप आणि फरार शिवकुमार गौतम यांच्याविरुद्ध याआधी कोणताही गुन्हा नोंद नाहीये. मात्र, हरियाणाचा शूटर गुरमेल याच्यावर याआधी खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी तो तुरुंगातही होता आणि काही महिन्यांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता. त्याला जामीनावर कोणी सोडलं हे माहित नाही असं त्याच्या आजीने सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT