Worli Accident : मोबाईल सुरु केला अन्...; मिहीर शाहाला पोलिसांनी कसे पकडले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह.
वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी कसे पकडले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहाला अटक

point

मुंबई पोलिसांनी मिहीर शाहाला कसे शोधले?

point

मिहीर शाह कुठे लपला होता?

Worli hit and run Update : वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी ९ जुलै रोजी अटक केली. तीन दिवसांपासून मिहीर शाह हा सतत ठिकाणा बदलत होता. पोलिसांची ११ पथके त्याच्या मागावर होती. मिहीर शाह पोलिसांना कसा सापडला, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. (How did Mumbai Police catch Mihir Shah)

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. अपघात झाल्यानंतर मिहीर शाह कलानगरमधून त्याच्या गोरेगावला त्याच्या प्रेयसीकडे गेला होता. त्यानंतर तो सतत ठिकाण बदलत होता. 

पोलिसांनी मिहीर शाहाला कसे पकडले?

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी ११ पथके तयार केली होती. पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज खंगाळून काढले आणि काही लोकांची चौकशी केली. यातून त्यांच्या हालचालीची माहिती मिळाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण? 

मिहीर शाह शहापूर येथे असल्याचे कळल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत मिहीर तिथून मित्रासोबत निघून गेला होता. पोलीस त्याचे लोकेशन शोधत होते. त्यातच मिहीरच्या मित्राने काही क्षणासाठी मोबाईल सुरू केला. त्यामुळे पोलिसांना ठिकाण कळले. पोलिसांनी लगेच विरारमध्ये पोहोचले. विरार फाटा येथे मित्रासोबत असलेल्या मिहीरला पोलिसांनी अटक केली.

अपघातानंतर प्रेयसीच्या घरी दोन तास झोपला

मिहीर शाह वरळीत अपघात झाल्यानंतर गोरेगावमध्ये प्रेयसीच्या घरी गेला होता. तिथे तो दोन तास झोपला. प्रेयसीने मिहीरच्या आईला फोन करून तो आपल्या घरी असल्याचे सांगितले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Worli Hit and Run प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश शाह कोण? 

मिहीरची आई मीना आणि बहीण त्याच्या एका मित्राला घेऊन मर्सिडीज कारने गोरेगावला आले. मिहीरला घेऊन ते आधी बोरिवली आणि नंतर शहापूरला गेले. शहापूरमधील एका रिसॉर्टमध्ये मिहीर, त्याची आई, दोन बहिणी आणि मित्र लपले होते. मिहीरला पळून जाण्यात मदत केल्या प्रकरणी पोलिसांनी मिहीरची आई, त्याच्या दोन बहिणी आणि मित्रांना ताब्यात घेतले आहे. मिहीर शाह, त्याची आई आणि दोन बहिणी, तसेच मित्र हे ठाणे, नाशिक आणि शहापूरमधील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये लपत होते, अशी माहितीही समोर आली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT