Kalyan Dombivali : कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीचा विनयभंग केल्यानंतर जाब विचारायला गेलेल्या...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील डोंबिवलीतील धक्कादायक घटना...

point

अंगणात खेळणाऱ्या 9 वर्षाच्या मुलीसोबत गैरकृत्य

point

जाब विचारायला गेलेल्या मराठी कुटुंबीयांना मारहाण

Kalyan Dombivali : कल्याणमध्ये परप्रांतीय व्यक्तिकडून मराठी भाषिकांना मराठी असण्यावरून शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार ताजाच असताना आणखी एक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना घडली आहे. एका 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली असून, त्यानंतर जाब विचारालया गेलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना आरोपी आणि त्याच्यासोबच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचं हे संपूर्ण दृश्य घराबाहेर असलेल्या एका CCTV कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपी उत्तम पांडे (46) आणि त्याची पत्नी रीना उत्तम पांडे (40) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा >> Cyber Fraud : एक चुकीचा क्लिक तुमचं अकाऊंट करेल रिकामं, e-Pan Card च्या नावाचा फेक मेलचा प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पोलीस कर्मचाऱ्यासोबतच हा प्रकार घडला. पोलीस कर्मचाऱ्याची 9 वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना आरोपी उत्तम पांडे तिथे आला आणि त्यानं मुलीला जबरदस्तीनं घरात ओढत नेलं. त्यानंतर त्यानं मुलीच्या चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. मुलीने संपूर्ण घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर कुटुंबीय आरोपी उत्तम पांडेच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता उत्तम पांडे आणि त्याची पत्नी रीना पांडे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. 

हे ही वाचा >> Sharad Pawar Call Devendra Fadnavis : शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोेलताना म्हणाले...

मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. मुलीच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी मुलीचा विनयभंग आणि तिच्या आई-वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT