Nanded : हॉर्न वाजवल्याचा राग, तरूणानं थेट फॉर्च्युनवर चढून हल्ला केला, गाडी चालवणाऱ्या डॉक्टरने थेट...

मुंबई तक

फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून ही घटना घडल्याचं समजतंय. सकाळी 11.30 च्या सुमारास नांदेडमध्ये ही घटना घडली. डॉ. प्रकाश नागरगोजे लोहा तहसीलच्या माळकोलीमध्ये रुग्णालय चालवतात. रोजच्या सारखंच ते आपल्या फॉर्च्युनर कारने नांदेडहून हॉस्पिटलला जात होते.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नांदेडमध्ये घडलेल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

point

आरोपीनं थेट फॉर्च्युनरवर चढून केला हल्ला

point

फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून घटना

नांदेडमध्ये आज आयटीआय चौकात एका तरुणानं चालत्या गाडीच्या छतावर चढून वाहन चालविणाऱ्या डॉक्टरवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून ही घटना घडल्याचं समजतंय. सकाळी 11.30 च्या सुमारास नांदेडमध्ये ही घटना घडली. डॉ. प्रकाश नागरगोजे लोहा तहसीलच्या माळकोलीमध्ये रुग्णालय चालवतात. रोजच्या सारखंच ते आपल्या फॉर्च्युनर कारने नांदेडहून हॉस्पिटलला जात होते. अचानक आयटीआय चौकात एक तरुण त्यांच्या गाडीवर चढला आणि हॉर्न वाजवल्याच्या रागात त्याला मारहाण करू लागला.

हे ही वाचा >> Satish Wagh Case : पतीला संपवणाऱ्या मोनिका वाघ नेमकं का रडत होत्या? पश्चाताप की नाटक? VIDEO का व्हायरल...

डॉ.नागरगोजे यांनी गाडी थेट पोलीस ठाण्याच्या दिशेनं नेण्याचा निर्णय घेतला. यावेळी हा तरुण गाडीच्या छतावर बसून त्यांना मारहाण करत होता. यावेळी रस्त्यावर उपस्थित असलेल्या इतर वाहनचालकांनी याचा व्हिडिओ घेतला. हा सगळा थरार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, रस्त्यावर उपस्थित असलेल्या लोकांच्या गर्दीनं डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही.

डॉ.नागरगोजे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच पोलिसांनी तत्काळ गाडीवर चढलेल्या आरोपीला ताब्यात घेतलं. स्थानिक पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा >> Crime News : आधी पत्नी आणि मुलाल संपवलं, मग आई-वडिलांवर हल्ला केला आणि नंतर... हादरवणारी घटना

या घटनेबाबत बोलताना डॉ.नागरगोजे म्हणाले, ते दररोज रुग्णालयात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. मात्र पहिल्यांदाच ही अशी घटना घडली असं ते म्हणाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या तरुणाला कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन त्यांनी डॉक्टरांना दिले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp