Palghar Crime: उत्कलाचं शीर छाटलं अन्... अखेर 'तो' जाळ्यात अडकलाच!

मुंबई तक

Palghar Murder Case: पालघरमध्ये पाच दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये महिलेचं शीर छाटलेलं सापडलं होतं. त्याच प्रकरणी सुरू असलेल्या तपासात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

ADVERTISEMENT

(फोटो सौजन्य: Gork AI)
(फोटो सौजन्य: Gork AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पालघर महिला हत्या प्रकरणाचा छडा लागला

point

पाच दिवसांपूर्वी महिलेचं छाटलेलं शीर सापडलं होतं

point

आता महिलेचा मृतदेह देखील सापडला

Palghar Wife Murder: पालघर: पालघरमधील विरार परिसरात साधारण पाच दिवसांपूर्वी एका बेवारस सुटकेसमध्ये महिलेचं छाटलेलं शीर सापडलं होतं. आता याच प्रकरणी पोलिसांना तपासात मोठं यश आलं आहे. विरार शहरातील एका नाल्यातून पोलिसांनी एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. धड नसलेला हा मृतदेह त्याच महिलेचा असल्याचं बोललं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची निर्घृण हत्या तिच्या पतीनेच केल्याचं आता समोर आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव उत्कला हिप्परगी (वय 51 वर्ष) असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती हरीश हिप्परगीला आधीच अटक केली होती.

हे ही वाचा>> Honeymoon वेळी झालेला पती-पत्नीचा मृत्यू, आता काकूने सांगितली नवी कहाणी

आधी गळा दाबून हत्या, नंतर...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जानेवारी रोजी पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर हरीशने उत्कलाचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर तो मृतदेह विरारमधील देशमुख फार्म जवळ घेऊन गेला आणि धारदार शस्त्राने त्याने आपल्या पत्नीचे शीर कापले. त्यानंतर त्याने तिचे शीर एका सुटकेसमध्ये घालून ते पीरकुंडा दर्ग्याजवळ फेकून दिलं आणि शरीराचा उरलेला भाग हा नाल्यात फेकून दिला होता.

तपासादरम्यान, घटनास्थळी सापडलेल्या एका पाकिटामुळे पोलिसांना मृत महिलेची ओळख पटविण्यास मदत झाली. यानंतर पोलिसांनी कसून तपास करत हरीशला अटक केली. त्यानंतर त्याने चौकशीदरम्यान हत्येची कबुली दिली.

हे ही वाचा>> प्रियकराने सोशल मीडियावर प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल, पण...

कसा सापडला उत्कलाचा मृतदेह?

मंगळवारी सकाळी मांडवी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने हरीशच्या माहितीच्या आधारे चार तास शोध मोहीम राबवली आणि अखेर उत्कलाचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे म्हणाले की, मृतदेह फॉरेन्सिक तपासणी आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp