Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट, नवी मुंबईतून 10 व्या आरोपीला अटक, कोण आहे भगवंतसिंह?

मुंबई तक

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट

point

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

point

नवी मुंबईतून एका आरोपीला अटक

Baba Siddique Case मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दसऱ्याला झालेल्या या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत. या प्रकरणात दररोज धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. सलमान खानला दिलेली धमकी, त्यानंतर त्याच्या घरावर झालेला गोळीबार आणि थेट त्याच लॉरेन्स गँगकडून झालेली बाबा सिद्दीकी यांची हत्या. असा हा घटनाक्रमक लॉरेन्स गँगची वाढत चाललेल्या दहशतीचा आलेख दाखवून देतेय. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलीस रोज या प्रकरणातील संशयितांची चौकशी करुन प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच आता त्यांच्या हाती 10 वा संशयित लागला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Police Arrested 10th accused in case of Baba Siddique Murder Case by lawrence bishnoi)

बाबा सिद्दीकी यांनी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर त्याला पाठिंबा देत त्याच्या सोबत उभे राहिल्यामुळेच त्यांची हत्या केल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत देशभरातून 9 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता नवी मुंबईतूनच भगवंतसिंह नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही 10 पर्यंत पोहोचली आहे. मुंबई पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केलेल्या भगवंतसिंहने उदयपूरमधून हत्यारं घेऊन एका आरोपीसोबत मुंबईपर्यंत प्रवास केला होता. तसंच तो सुरूवातीपासूनच इतर आरोपींच्या संपर्कात होता. 

हे ही वाचा >>BJP Candidate List : किती विद्यमान आमदारांना संधी, कुणाला डच्चू? भाजपच्या यादीचं10 मुद्द्यांमध्ये विश्लेषण

 

 

मुंबई पोलिसांच्या तब्बल 15 टीम बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी शनिवारी एकाच दिवशी 5 आरोपींना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी डोंबिवलीमधून नितिन सप्रे, पनवेलमधून रामफुलचंद कनौजिया, संभाजी पारधी, प्रदीप ठोंबरे, चेतन पारधी यांना अंबरनाथमधून ताब्यात घेतलं होतं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सलमानचे वडील सलीम खान काय म्हणाले?

सलमान खानला धमक्या देत असलेला लॉरेन्स बिश्नोई जरी बाबा सिद्दीकी प्रकरणात सहभागी असला तरी या प्रकरणाचा आणि सलमान खानचा काहीही संबंध नाही. हा एक पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. तसंच बाबा सिद्दीकी हे सलमानचे चांगले मित्र होते, खूप जुनी मैत्री होती. बाबा सिद्दीकींनी अनेक लोकांना मदत केली होती, मात्र आता काय करू शकतो... असं म्हणत सलीम खान यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

हे ही वाचा >>BJP Marathwada Candidate : संतोष दानवे, बबनराव लोणीकर ते राणाजगजितसिंह... मराठवाड्यात भाजपकडून कुणाकुणाला संधी?

 

सलीम खान यांना पुढे लॉरेन्स बिश्नोईबद्दल आणखी प्रश्न विचारण्यात आले. "1998 ला झालेल्या हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटींगदरम्यान काळवीटाची शिकार केली होती, त्यामुळे सलमानने माफी मागावी" अशी मागणी लॉरेन्स बिश्नोईने केली आहे. यावर सलीम खान म्हणाले की, सलमानने कोणत्याही प्राण्याची शिकार केलेली नाही. आम्ही साधं झुरळही मारलं नाही असं म्हणत सलीम खान यांनी मुलावरचे आरोप फेटाळले. "सलमानने मला सांगितलं आहे की मी असं काही केलं नव्हतं, मला त्याने त्यावेळी सांगितलं होतं, तो माझ्याशी खोटं बोलणार नाही, तो प्राणी मारणार नाही, त्याला प्राण्यांवर प्रेम आहे." असं सलीम खान म्हणाले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT