Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी युपी मॉडेल का राबवला? Inside Story
Baba Siddique Case Update :बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या अनेक आरोपींची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बाबा सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट
बाबा सिद्दीकींच्या हत्याकांडातला युपी मॉडेल काय?
मुुंबई पोलिसांच्या तपासा धक्कादायक खुलासा
Baba Siddique Case Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्याकांडात पुण्यातील लोणकर बंधूंची नावे समोर आली आहेत. याच लोणकर बंधूंनी सिद्दीकीची हत्या करण्यासाठी शूटर नेमले होते. मात्र हे शूटर त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रातून मिळाले असते. मग त्यांनी युपीतूनच शूटर का मागवले? यामागचे नेमकं कारण काय होतं? हे जाणून घेऊयात. (baba siddiqui case update why shooter hire from uttar pradesh pune lonkar brother lawrence bishnoi gang)
बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या अनेक आरोपींची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने सांगितले की, त्याला बाबा सिद्दीकी कोण आहे आणि त्याच्या हत्येनंतर कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया उमटतील हे चांगले ठाऊक होते. त्यामुळेच आरोपींनी शुभम लोणकर याच्याकडे एक कोटी रुपयांची सुपारी मागितली होती. पण शूभम लोणकरने ही रक्कम जास्त असल्याचे सांगत प्लॅन बदलला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Baba Siddique Case : आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडला बाबा सिद्दींकीच्या मुलाचा फोटो, स्नॅपचॅटवरुन...
आरोपी पुढे म्हणाला, शुभम लोणकरला माहित होते की, उत्तर प्रदेशातील लोकांना बाबा सिद्दीकी कोण आहेत? महाराष्ट्रात त्या व्यक्तीची प्रतिमा काय आहे? याची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे ते शूटर कमी रकमेत काम करण्यात तयार झाले होते.
पनवेल आणि कल्याण-डोंबिवलीच्या शूटरसोबत हत्येचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्यानंतर शुभम लोणकरने हे कॉन्ट्रॅक्ट उत्तर प्रदेश मॉड्यूलला दिले, म्हणजेच तेथील शूटर्सना दिले. ज्यामध्ये धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार गौतम यांना दिले होते. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असून फरार आरोपींच्या शोध घेतला जात आहे.
हे वाचलं का?
मुंबईतून 5 आरोपींना अटक
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासा दरम्यान मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी अंबरनाथ, डोंबिलवी आणि पनवेल परिसरातून 5 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये नितीन सप्रे (वय 32 वर्ष डोंबिवली) संभाजी पारधी (वय 43 पनवेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर राम कनोजिया (44), प्रदीप ठोंबरे (37) आणि चेतन पारधी (27) यांना अंबरनाथ येथून अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : Baba Siddique Case : "बाबा सिद्दीकी काय भला माणूस नव्हता...", दिल्लीत पकडलेला शार्प शूटर काय म्हणाला?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT