Baba Siddique Case : "बाबा सिद्दीकी काय भला माणूस नव्हता...", दिल्लीत पकडलेला शार्प शूटर काय म्हणाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

लॉरेन्स गँगचा शार्प शूटर काय म्हणाला?
लॉरेन्स गँगचा शार्प शूटर काय म्हणाला?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिल्ली पोलिसांनी शार्प शूटरला अटक

point

बाबा सिद्दीकींबद्दल काय म्हणाला आरोपी?

point

आरोपी दिल्ली पोलिसांसोबतच्या चकमकीत जखमी

Baba Siddique Case Update मुंबई : लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतल्यानंतर देशभरात खळबळ उडली. थेट समोरासमोर गोळ्या घालून लॉरेन्स बिश्नोईच्या गुडांनी बाबा सिद्दीकी यांना ठार केलं. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानला सुरु असलेल्या धमक्यांच्या दरम्यान घडलेल्या या घटनेचा सलमान खानच्या कुटुंबा धसका घेतलाय. त्यामुळेच वेगवेगळ्या दृष्टीकोनातून हा हल्ला म्हणजे सलमानलाही धक्का असल्याचं म्हटलं जातंय. याचं कारण आहे बाबा सिद्दीकी आणि सलमान यांची मैत्री. त्यातच आता दिल्ली आणि मथुरा पोलिसांनी केलेल्या एका संयुक्त कारवाईत पकडलेल्या आरोपीने बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलंय. ( Delhi Police arrested Yogesh kumar statement on baba Siddique case and MCOCA Act)

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील शार्प शूटर योगेशला पोलिसांनी बदायूमधून अटक केली. पकडताना झालेल्या चकमकीत त्याला गोळी लागल्यानं सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या रागातून आपण गुन्हेगारी जगतात आलो असं योगेशने सांगितलं. तसंच लॉरेन्स बिश्नोईसाठी काम करत असलेल्या हाशिम बाबा याच्या गँगमध्ये काम करत असल्याचं सांगितलं.

हे ही वाचा >> RAW: ही आहे RAW एजंटची कहाणी, वाचून तुम्हीही जाल हादरून!

पोलिसांनी यावेळी योगेशकडून वेगवेगळ्या प्रकरणांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबद्दलही एक वक्तव्य केलं आहे. "बाबा सिद्दीकी काही भला माणूस नव्हता, त्यांच्यावरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे", असं आरोपीने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपीचा पूर्ण सहभाग असल्याच्या शक्यता दाट झाल्या आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

आरोपी योगेशने पुढे आपल्या गँगबद्दल बोलताना सांगितलं, बिश्नोई गँग ही खूप मोठी गँग असून, ती आता फक्त भारतातच नाही, तर भारताबाहेरही पसरली आहे. टार्गेटवर असलेल्या तसंच रेकी करायची असलेल्या कुणाबद्दलचीही माहिती नेट आणि इतर माध्यमातून सहज मिळते. तसंच खंडणीसाठी उगाच कुणालाही टार्गेट केलं जात नाही. दरम्यान, मथुरा पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत  गुरूवारी नंबर नसलेली एक दुचाकी आणि एक पिस्तूलही जप्त केली आहे. तसंच काही काडतूसही जप्त करण्यात आलेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Lawrence Bishnoi: दाऊदचाच पॅटर्न, बाबा सिद्दीकींची सुपारी घेणारा लॉरेन्स बिश्नोई 'B' कंपनीच्या तयारीत?

 

योगेश कुमार हाच दिल्लीतील थरारक अशा नादिर शाह हत्याकांडात शार्प शूटर असल्याचा संशय आहे. याच प्रकरणात दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत होती. या घटनेनंतर योगेश कुमार अनेक दिवस फरार होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो कायम राहण्याचं ठिकाण बदलत होता. अखेर एका खबऱ्यानं दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी सापळा रचला आणि योगेश कुमारच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे आता या आरोपीकडून बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल काय काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT