Crime: गायक सापडला मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत, दोघांना नग्नावस्थेत बेदम मारहाण

रोहित गोळे

ADVERTISEMENT

shocking incident local folk singer beaten naked in a locked room after he was caught red handed with a girl offensive situations bihar crime
shocking incident local folk singer beaten naked in a locked room after he was caught red handed with a girl offensive situations bihar crime
social share
google news

पटना: बिहारच्या (Bihar) बेगुसरायमध्ये लोकांनी एका स्थानिक लोक गायकाला एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघांनाही बंद खोलीत नग्न करून बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी पीडितेची चौकशी करून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. (shocking incident local folk singer beaten naked in a locked room after he was caught red handed with a girl offensive situations bihar crime)

ADVERTISEMENT

हार्मोनियम शिकवण्याच्या बहाण्याने लोक गायक किशन चौरसिया याने मुलीला फूस लावून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांनी या लोकगायकावर गुन्हा दाखल केल्याचं समजतं आहे. यासोबतच मारहाण करणाऱ्या तरुणांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा >> सातारा जिल्हा हादरला! घरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे प्रेमी युगल आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही लोक दोघांना मारहाण करत व्हिडिओ शूट करत आहेत. यावेळी मुलगी दयेची भीक मागत आहे आणि स्वतःला कपड्याने झाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मारहाण करणारे तरुण तिला तसे करण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे हे सगळं प्रकरण गांभीर्याने घेत पोलीस आता सखोल तपास करत आहेत.

हे वाचलं का?

लोकगायक तरुणीसोबत सापडला आक्षेपार्ह अवस्थेत

मध्यमवयीन किशन देव चौरसिया हे गावात कीर्तन-भजनाचे काम करतात आणि हार्मोनियम शिकवण्याचे कामही करतात. त्याचे शेजारी राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. याप्रकरणी एसपी योगेंद्र कुमार म्हणाले की, एक व्हिडिओ सापडला आहे, ज्यामध्ये एका मध्यमवयीन व्यक्तीला एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत लोकांनी पकडले आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर हल्ला देखील केला.

हे ही वाचा >> Kalyan: ‘नात माझ्याकडून सटकली अन् नाल्यात…’, ‘तेव्हा’ काय घडलं आजोबांनी सांगितलं!

पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत

या व्हिडिओची गांभीर्याने चौकशी केली जात आहे. एसडीपीओ तेघरा हे प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे एसपीचे म्हणणे आहे. तसेच ग्रामस्थांशी बोलून संपूर्ण प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. असंही एसपी यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT